कधी कधी नाईलाजाने भूमिका घ्यावी लागते. तशीच भूमिका बाळासाहेब ठाकरे यांना नारायण राणेंविषयी घ्यावी लागली. पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी जे सांगितलं ते सत्यच आहे. नारायण राणेंना शिवसेना सोडायची नव्हती. पण बाळासाहेबांचा नाईलाज झाला म्हणूनच त्यांनी राज ठाकरेंना सांगितलं की राणेंना माझ्याकडे आणू नका, असं वक्तव्य भाजपाचे आमदार नितेश राणेंनी केलं आहे. विधासभेच्या बाहेर नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर मराठी माणूस उद्धव ठाकरेंना…

आपण ज्या माणसावर म्हणजे उद्धव ठाकरेंवर महाराष्ट्र सहानुभूती दाखवतो पण उभ्या महाराष्ट्राला हे कळूदेत की हा व्यक्ती कसा आहे. शिवसेना नावाचा हा पक्ष संपवण्याचं कारण उद्धव ठाकरेच आहेत हे वारंवार सिद्ध होतं आहे. भविष्यात कधीतरी राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि नारायण राणेंना एकाच व्यासपीठावर बोलवा. त्यांना विचारा की उद्धव ठाकरे कसे आहेत. उद्धव ठाकरेंना त्यानंतर कुणीही कधीही सहानुभूती दाखवणार नाही एवढं मी विश्वासाने सांगू शकतो असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे. उलट मराठी माणूस उद्धव ठाकरेंना चपलेने मारतील. मराठी माणूस, शिवसेना यांच्याशी गद्दारी जर खऱ्या अर्थाने कुणी केली असेल तर ती उद्धव ठाकरेंनी केली. बाळासाहेब ठाकरेंना धमक्या कुणी दिल्या तर त्या उद्धव ठाकरेंनी दिल्या असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.

काय म्हणाले राज ठाकरे नारायण राणेंबाबत?

नारायण राणेंनी शिवसेनाच सोडली नसती. मी तुम्हाला तो प्रसंग सांगतो. नारायण राणे पक्ष सोडणार हे कळलं होतं. मी त्यांना फोन केला, मी त्यांना म्हटलं अहो राणे हे काय करताय? शिवसेना सोडू नका. नारायण राणे मला म्हणाले की मला जायचं नाही पण..त्यावर मी त्यांना सांगितलं की बाळासाहेबांशी बोलतो. राणेंचा फोन ठेवल्यावर मी लगेच बाळासाहेबांना फोन केला. त्यांना सांगितलं नारायण राणेंना शिवसेना सोडायची नाही. मला बाळासाहेबांनी लगेच सांगितलं त्याला घेऊन ये. मी नारायण राणेंना फोन केला आणि सांगितलं बाळासाहेबांनी बोलावलं आहे आपण जाऊ ते म्हणाले मी लगेच निघालो. हा फोन झाल्यानंतर पाच मिनिटांनी मला बाळासाहेबांनी फोन केला. मला म्हणाले नारायण राणेंना आणू नकोस, तेव्हा त्यांच्या मागून कुणीतरी बोलत होतं हे माझ्या लक्षात येत होतं. बाळासाहेबांनी फोन करून येऊ नकोस सांगितल्यावर मला राणेंना सांगावं लागलं की येऊ नका.मग सगळ्या पुढच्या गोष्टी घडल्या. लोकांनी बाहेर पडावं यासाठी परिस्थिती निर्माण केली गेली. तेव्हा शिवसेनेत जी परिस्थिती निर्माण झाली त्याचा शेवट हा आता असा झाला. 

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोवर नितेश राणेंचं भाष्य

उद्धव ठाकरे आजारी आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी थोडी साथ दिली असेल. एकच गेट आहे त्यातून येताना तो फोटो काढला आहे. त्यात काय विशेष बाब आहे? असं म्हणत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या फोटोवर भाष्य केलं आहे.

Land जिहाद ही मोठी समस्या आहे

Land जिहाद ही फार मोठी समस्या आहे. हिंदूंच्या विरोधात षडयंत्र आहे. हिंदू समाजाला जेवढी लव्ह जिहादची समस्या भेडसावते आहे तेवढीच समस्या लँड जिहादची आहे असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे. फक्त माहीमकडे पाहून चालणार नाही. मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात लँड जिहादची प्रकरणं दिसतील. चांदिवलीमध्ये मुंबई महापालिकेच्या ग्रीन झोन लँडवर आधी मझार उभी केली आहे. आत्ता तुम्ही कॅमेरा जाऊन या तिथे चार मजली मदरसा बांधला जातो आहे. चेंबूर स्टेशनला नाल्यावर अतिक्रमण करून मशिद उभी राहते आहे. नुसतं माहीम, सांगलीपुरता प्रश्न नाही. महाराष्ट्रात हिंदूंची लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न करण्याचं हे षडयंत्र आहे असाही आरोप नितेश राणेंनी केला आहे. मुंबईतला मुस्लिम समाज १० वरून २० टक्के झाला आहे. त्याचं कारण हे लँड जिहाद आहे असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray told the correct thing about narayan rane said nitesh rane scj
Show comments