राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. तेलंगणा आणि मिझोराम या दोन राज्यांमध्ये भाजपचा प्रभान नसला तरीही मध्य प्रदेश, राजस्थान आणि झारखंड या तीन महत्वाच्या राज्यांमधली सत्ता भाजपाला गमवावी लागली आहे. या पराभवानंतर सर्वच स्तरातून नरेंद्र मोदी आणि अमित शाह जोडगोळीवर टिकेची झोड उठत आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या व्यंगचित्रातून सलग दुसऱ्या दिवशी भाजपाला आपल्या टिकेचं लक्ष्य केलं आहे.

पराभवानंतर भाजप नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीचं चित्रण राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रात केलं आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बसवलेलं दाखवून स्टेथस्कोपने एकमेकांची तब्येत तपासताना दाखवलं आहे. याचसोबत भिंतीला टेकून लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह हे नेते आपल्या सर्वोच्च नेत्यांकडे हसताना दाखवले आहेत. आपल्या व्यंगचित्रात यावेळी राज ठाकरेंनी सोशल मीडियावरील मोदी भक्तांनी लक्ष्य केलं आहे. राज यांच्या व्यंगचित्राला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळतो आहे. कालही राज ठाकरेंनी भाजपच्या पराभवावर व्यंगचित्रातून टीका केली होती.

अवश्य वाचा – नरेंद्र मोदींच्या सत्तेला तडा ! राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून फटकारे

Story img Loader