scorecardresearch

“…तर त्या बदल्यात दसरा मेळाव्याला सहकार्य करू”, काँग्रेसने शिवसेनेला प्रस्ताव दिल्याचा मनसेचा मोठा दावा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते गजानन काळे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचा उल्लेख ‘नवाब सेना’ असा करत मोठा दावा केला आहे.

“…तर त्या बदल्यात दसरा मेळाव्याला सहकार्य करू”, काँग्रेसने शिवसेनेला प्रस्ताव दिल्याचा मनसेचा मोठा दावा
गजानन काळे व उद्धव ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते गजानन काळे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचा उल्लेख ‘नवाब सेना’ असा करत मोठा दावा केला आहे. काँग्रेसने ठाकरे गटाला प्रस्ताव दिला आहे आणि त्यानुसार शिवसेना (ठाकरे गट) भारत जोडोत सहभागी झाल्यास काँग्रेस त्यांच्या दसरा मेळाव्याला सहकार्य करणार आहे, असा दावा गजानन काळे यांनी केला.

गजानन काळे म्हणाले, “‘नवाब सेने’ने भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावं आणि त्या बदल्यात शिवतीर्थावर होणाऱ्या तुमच्या टोमणे मेळाव्याला सहकार्य करू, असा प्रस्ताव काँग्रेसने उद्धव सेनेला दिला आहे. याचा अर्थ नवाब सेनेचा, उद्धव सेनेचा शिवतीर्थावर होणारा टोमणे मेळावा आता काँग्रेसच्या जीवावर होणार आहे. हा प्रकार बुडत्याला काडीचा आधार आहे.”

हेही वाचा : शिवसेना पक्षचिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडे, मनसेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “राज ठाकरेंनी…”

“पीएफआयबाबत नवाब सेनेचे प्रमुख, त्यांचे छोटे नवाब आणि त्यांच्या सेनेकडून अजूनपर्यंत अधिकृत भूमिका का आलेली नाही हे यावरून कळते. ते हिरवी मशाल घेऊन शिवतीर्थावर टोमणे मेळावा होणार आणि लोकांचं मनोरंजन होणार आहे हे नक्की,” असं म्हणत गजानन काळेंनी शिवसेनेच्या ठाकरे गटावर जहरी टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या