महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नक्कल करत त्यांच्यावर टीकास्र सोडलं. त्यांच्या या टीकेनंतर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे आमने-सामने आले. “राजकारण म्हणजे मिमिक्री नाही. आम्हाला जर मिमिक्री पाहायची असेल, काही मुद्रा अभिनय, नाट्य अभिनय पाहायचा असेल तर आम्ही जॉनी लिव्हरला पाहू, आम्हाला राजू श्रीवास्तव आवडायचा” अशी उपरोधिक टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.

aam aadmi party AAP
आपचे खासदार संजय सिंह यांना मिळालेल्या जामिनाचे कारण काय? त्यांच्या वकिलांकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात आला?
arvind kejriwal
लालकिल्ला: सहानुभूतीच्या लाटेवर केजरीवाल?
Case of Allegedly Inciting Speech Demand to file case against Nitesh Rane and Geeta Jain
कथित प्रक्षोभक भाषण केल्याचे प्रकरण : नितेश राणे, गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल करा
complaint filed against me in cbi ed by using sim card and aadhaar card chhatrapati sambhajinagar police commissioner manoj lohiya
“आपल्याविरुद्ध सीबीआय, ईडी, ठाण्यात तक्रार दाखल” बनावट फोन, लिंक पाठवण्याचे प्रकार निदर्शनास, पोलीस आयुक्तांची माहिती

राऊतांच्या या टीकेला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गेल्या शंभर दिवसात महाराष्ट्रातील जनता कादर खान यांच्यासारख्या अभिनयाला मुकली होती. आता संजय राऊतांच्या स्वरुपात हा कादर खान दररोज आक्रस्ताळेपणा करत अभिनय करत आहे. रोज सकाळी उठून कादर खानप्रमाणे आक्रस्ताळेपणा करणं म्हणजे राजकारण आहे का?” असा सवाल गजानन काळेंनी विचारला आहे.

हेही वाचा- “आज आपण मेंदूहीन राज ठाकरेंना…” राहुल गांधींवरील टीकेला काँग्रेसचं प्रत्युत्तर

सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी करत गजानन काळे म्हणाले, “गेल्या शंभर दिवसांपासून महाराष्ट्रातील जनता कादर खान यांच्यासारख्या अभिनयाला मुकली होती. वंचित झाली होती. संजय राऊतांच्या स्वरुपात हा कादर खान आता दररोज आक्रस्ताळेपणा करून अभिनय करत आहे. कादर खान यांच्यासारखं रोज सकाळी उठून आक्रस्ताळेपणा करणे म्हणजे राजकारण आहे का?” असा टोला काळेंनी लगावला.

हेही वाचा- “राजकारण म्हणजे मिमिक्री नाही, आपण आता…”; राज ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांकडून प्रत्युत्तर!

संजय राऊतांवर टीकास्र सोडताना गजानन काळे पुढे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणालासुद्धा काँग्रेसवाले मिमिक्री म्हणायचे. आज याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लाळघोटेपणा संजय राऊत करत आहेत. त्यांचीच भाषा बोलत आहेत. हे दुर्दैव आहे. तुमच्या पोपटपंचीला आता जनता कंटाळली आहे. लोक तुम्हाला ‘शिल्लक सेना’ असं म्हणू लागले आहेत. ४० आमदार आणि खासदारांसह नगरसेवक पक्ष सोडून गेले आहेत. मात्र, संजय राऊतांच्या बेताल विधानांमुळे आता उरलेली ‘शिल्लक सेना’ही संपते की काय? असं लोकांना वाटत आहे.”