scorecardresearch

“मुख्यमंत्र्यांना एवढं उशीरा शहाणपण का सूचलं”? गोविंदांना १० लाखांचा विमाकवच देण्याच्या निर्णयावर मनसेचा खोचक सवाल

गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारकडून गोविंदांना १० लाख रुपयांचे विमा कवच देण्यात येणार आहे.

“मुख्यमंत्र्यांना एवढं उशीरा शहाणपण का सूचलं”? गोविंदांना १० लाखांचा विमाकवच देण्याच्या निर्णयावर मनसेचा खोचक सवाल
गोविंदांना मिळणाऱ्या विमा कवचावरुन मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

गोविंदा पथकांसाठी शासनाने विमा कवच द्यावा, अशी मागणी होत होती. या मागणीनुसार, दहीहंडी पथकातील गोविंदांना आता १० लाखांचं विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. या निर्णयावर मनसेकडून टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना एवढं उशीरा शहाणपण का सूचलं? असं म्हणत मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी खोचक सवाल विचारला आहे.

हेही वाचा- ‘राष्ट्रवादीचा मोठा नेता जेलमध्ये जाणार’ म्हणणाऱ्या मोहित कंबोज यांना मिटकरींचा टोला, म्हणाले “कोणाच्या चड्डीचा नाडा…”

दोन दिवसात राज्य सरकार नियोजन कसं करणार?

“मुख्यमंत्र्यांनी दहीहंडी पथकातील गोविंदांना १० लाखांचे विमा कवच देण्याचा निर्णय घेतला हे ऐकूण खूप आनंद झाला. परंतु येत्या दोन दिवसांमध्ये (१९ ऑगस्ट) दहीहंडी आहे हे मुख्य़मंत्री विसलेले आहेत. विमा कंपनींना नाव, वय आणि फोन नंबर द्यावा लागतो तेव्हा विमा उतरवला जातो. हे सगळं नियोजन मुख्यमंत्री किंवा राज्य सरकार कसं करणार आहे?” असा प्रश्न विचारत चव्हाणांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.

हेही वाचा- “गद्दार आमदारांची भाषा ऐकून प्रश्न पडतो की…”, आदित्य ठाकरेंची शिंदे सरकारवर आगपाखड!

गोविंदांसाठी राज्याशासनाकडून भेट

गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे दहीहंडीवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यंदा हे निर्बंध काढण्यात आले असून राज्य सरकारने दहीहंडीसाठी सार्वजनिक सुट्टीही जाहीर केली आहे. राज्यात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. मात्र, विशेष: मुंबईमध्ये हा सण जोरात साजरा केला जातो. रात्र-रात्र भर गोविंदा मानवी मनोरे रचण्याचा सराव करत असतात. दहीहंडीच्या दिवशी अनेक दुर्घटनांमध्ये गोविंदा जखमी किंवा मृत्यूमुखीही पडतात. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाची अवस्था बिकट होते. त्यामुळे गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारकडून गोविंदांना १० लाख रुपयांचे विमा कवच देण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या