गेल्या १५ दिवसांपासून राज्यात आधी खेडमधील उद्धव ठाकरेंची सभा आणि त्यानंतर रविवारी झालेली एकनाथ शिंदेंची सभा यावरून जोरदार राजकीय चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खेडमध्ये सभा पार पडली. या सभेत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. या पार्श्वबूमीवर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना दुसरीकडे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेची उत्सुकता वाढू लागली आहे. येत्या २२ मार्च रोजी गुढी पाडव्याच्या दिवशी मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे भाषण करणार आहेत. यावेळी राज ठाकरे काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

मनसेच्या पाडवा मेळाव्याचा टीझर!

मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मनसेच्या पाडवा मेळाव्याचा टीझर शेअर करण्यात आला आहे. याआधी ९ मार्च रोजी मनसेच्या वर्धापन दिनी झालेल्या कार्यक्रमातही राज ठाकरेंनी काही प्रमाणात राजकीय भूमिका मांडली होती. तसेच, मनसेनं आजपर्यंत कोणती आंदोलनं केली आणि त्याचा काय परिणाम झाला, याची माहिती देणारी मनसेची वेबसाईटही राज ठाकरेंनी लाँच केली. मात्र, तेव्हाही राज ठाकरेंनी २२ मार्चला गुढी पाडव्याच्या सभेत सविस्तर राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणाविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

MNS, Mahayuti campaign, Pune, MNS pune,
पुण्यात मनसे महायुतीच्या प्रचारात उतरणार… पण मनसेच्या नेत्यांनी ठेवली ‘ही’ अट
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त

मनसेच्या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरेंची क्लिप!

दरम्यान, मनसेकडून गुढी पाडव्यासंदर्भात जारी केलेल्या टीझरमध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानाची एक क्लिप समाविष्ट करण्यात आली आहे. या क्लिपमध्ये बाळासाहेब ठाकरे एका सभेत मशिदींवरील लाऊडस्पीकर खाली उतरवण्याबाबत भाष्य करताना दिसत आहेत. “मशिदीवरचे लाऊडस्पीकर खाली येतील..बंद” असं बाळासाहेब ठाकरे म्हणताना दिसत आहेत. यासह मशिदींवरचे भोंगे बंद करण्याची बाळासाहेब ठाकरेंची इच्छा राज ठाकरेंनी पूर्ण केल्याचाही दावा या टीझरमध्ये करण्यात आला आहे.

तळपत्या ठाकरी विचारांचा वारसा…!

एकीकडे शिंदे गट आणि ठाकरे गट आपणच बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार असल्याचा दावा करत असताना मनसेच्या टीझरमध्ये बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा राज ठाकरेंकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. “तळपत्या ठाकरी विचारांचा वारसा जपण्यासाठी चला शिवतीर्थावर”, असं यात म्हटलं आहे. त्यामुळे आता बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा नेमका वारसा कुणाकडे? असाही प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जाऊ लागला आहे.