मनसे नेते संदीप देशपांडे यांना आज सकाळी शिवाजी पार्कजवळ काही अज्ञात व्यक्तींनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर देशपांडे यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. या हल्ल्याचे पडसाद सध्या राजकीय वर्तुळात उमटत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी केली आहे.

यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या लोकांनी संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केला असता, तर ते आठ-दहा दिवस कोमात गेले असते, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. राऊतांच्या या विधानानंतर अमेय खोपकर यांनी संजय राऊतांना थेट खुलं आव्हान दिलं आहे. एवढीच मस्ती आली असेल तर सुरक्षाव्यवस्था दूर करून शिवसेना भवनाच्या मैदानात भेटू, मग आम्ही तुम्हाला कपडे काढून फटके मारू, अशी प्रतिक्रिया अमेय खोपकर यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
Rohit Pawar Post Against Raj Thackeray
“तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक’ असं..”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यावर रोहित पवारांची पोस्ट
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

हेही वाचा- “औरंग्याच्या तुष्टीकरणावर तुम्ही…”, MIMच्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकताच बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र!

संजय राऊतांवर टीकास्र सोडताना अमेय खोपकर म्हणाले, “सर्वात आधी त्यांना शिमग्याच्या शुभेच्छा… तुमच्यात एवढीच जर मस्ती असेल, तर तुमची सुरक्षा व्यवस्था बाजुला करा. आम्ही आमची सुरक्षा व्यवस्था बाजुला करू… मग आपण शिवसेना भवनाच्या मैदानात भेटू… तिथे तुम्हाला आम्ही कपडे काढून पार्श्वभागावर फटके मारू…”

हेही वाचा- ५०० कोटींचा घोटाळा: उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय तुरुंगात जाणार? किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप

नेमकं प्रकरण काय?

मनसे नेते संदीप देशपांडे आज सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी शिवाजी पार्क परिसरात गेले होते. यावेळी तिथल्या एका टोळक्यानं त्यांच्यावर हल्ला केला. स्टम्पच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात संदीप देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. यानंतर त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरेही त्यांची भेट घेण्यासाठी हिंदुजा रुग्णालयात गेले होते. उपचारांनंतर संदीप देशपांडेना घरी सोडण्यात आलं.