scorecardresearch

‘राज की बात शेअर करणार, पिक्चर अभी बाकी है,’ मनसेच्या अमेय खोपकरांचे सूचक ट्वीट, चर्चांना उधाण

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे तसेच इतर जवळपास ४० आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यात नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत.

AMEYA KHOPKAR
अमेय खोपकर (संग्रहित फोटो)

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे तसेच जवळपास ४० आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला सध्यातरी अभय दिले असून येत्या १२ जुलैपर्यंत अपात्रतेची कोणतीही कारवाई करु नये, असे राज्य सरकारला सांगितले आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, प्रतोद सुनील प्रभू आणि नव्याने नियुक्ती झालेले गटनेते अजय चौधरी यांना नोटीस पाठवली आहे. पाच दिवसात त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. ११ जुलैला यासंदर्भात पुढील सुनावणी होणार आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता मनसेचे नेते अमेय खोपकरांनी काल रात्री (सोमवार २७ जून) एक सूचक ट्वीट केले असून उद्या (म्हणजेच २८ जून) राज की बात शेअर करणार आहे, असे सांगितले आहे.

हेही वाचा >>> राठोडांची ३८ मिनिटांची ‘सीडी’ आमच्याकडे!; तरुणी आत्महत्या प्रकरणाचा पाठपुरावा करणार; यवतमाळ शिवसेना जिल्हाप्रमुखांचा गौप्यस्फोट 

“असा हा ‘धर्मवीर’…एक ‘राज’की बात उद्या शेअर करणार आहे. पिक्चर अभी बाकी है,” असे अमेय खोपकर आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. राज ठाकरे यांच्यावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून ते घरी परतले आहेत. असे असताना खोपकर आज नेमका काय गौप्यस्फोट करणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

हेही वाचा >>> “महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याची…”, भाजपाला लक्ष्य करत शिवसेनेचा हल्लाबोल; “लाज असती तर…” म्हणत बंडखोरांवर टीका

एकनाथ शिंदे यांचा राज ठाकरेंना फोन

सध्या एकनाथ शिंदे यांनी आपला गट कोणत्याही पक्षात विलीन केलेला नाही. अजूनही आम्ही कोणत्या पक्षात सामील झालेलो नाही. आम्ही शिवसेनेतच राहणार, असे बंडखोर आमदारांकडून सांगितले जात आहे. असे असताना शिंदे यांनी राज ठाकरे यांना एकूण दोन वेळा भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला आहे. या फोन कॉलमध्ये काही राजकीय चर्चा झाल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या प्रकृतीची चौकशी केली.

पाहा व्हिडीओ –

दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना आज अमेय खोपकर नेमकी काय माहिती देणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns leader ameya khopkar tweet said going to tell something secret information prd