महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे मागील काही दिवसांपासून कोकण दौऱ्यावर आहेत. मनविसेच्या माध्यमातून ते महासंपर्क अभियान राबवत आहेत. विविध ठिकाणी जाऊन ते कार्यकर्त्यांसोबत बैठका घेत आहेत. आज ते कर्जमध्ये होते. याठिकाणी बैठक संपल्यानंतर अमित ठाकरे फुटबॉल जगलिंग करताना दिसले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज कर्जतमध्ये प्रसन्न बनसोडे यांच्या पुढाकाराने कोकण कर्जत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पोर्ट किटचं वाटप करण्यात आलं. अमित ठाकरे यांच्या हस्ते हे स्पोर्ट कीट देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या क्रीडा साहित्य संचात फुटबॉल देखील होता. हा फूटबॉल पाहताच अमित ठाकरे यांनी काही क्षण फुटबॉल जगलिंग (juggling) चा आनंद लुटला. राजकारणासोबतच फुटबॉलवर असलेलं त्याचं प्रेम कार्यकर्त्यांना पाहायला मिळालं.

eknath shinde and uddhav thackeray
मोदींची वक्रदृष्टी पडल्यास तोंडाला फेस येईल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
वीस वर्षे ‘ज्या’ व्यक्तीविरोधात संघर्ष केला तिलाच राष्ट्रवादीने आयात केलं, साहजिकच विलास लांडे नाराज होतील – अमोल कोल्हे
CM Eknath Shinde
शिवसेनेच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर, ‘या’ नेत्याचं नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा

दुसरीकडे, अमित ठाकरे यांनी कोकण दौऱ्यावर असताना एक ट्रेक देखील केला आहे. या ट्रेकचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. संबंधित पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, “कोकणचा निसर्ग आपण जिवापाड जपला पाहिजे.” संबंधित ट्रेकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावेळी अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या होत्या.

हेही वाचा- धबधब्यासमोर काढलेले फोटो शेअर करत अमित ठाकरे म्हणाले, “कोकणासारखं निसर्ग सौंदर्य परदेशात आपल्याला…”

संबंधित पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, “काल सावंतवाडी इथल्या संवाद बैठका संपल्यानंतर सहकाऱ्यांसह आंबोली घाटातल्या चौकुळ कुंभवडे गावाच्या परिसरात गेलो होतो. कोकणचा ‘रानमाणूस’ प्रसाद गावडे यांच्यासोबत भटकंती केली. इको-टुरीझमचे महत्त्व जाणून घेतले. सह्याद्रीतील अनेक नद्यांचे उगमस्थान असलेल्या या निसर्गरम्य परिसरात पायवाटेवर अनेक धबधबे पाहिले. बायो-डायव्हर्सिटीने संपन्न असा हा सावंतवाडी, दोडामार्ग इथला वाईल्ड लाईफ कॉरिडॉर आपण सर्वांनी जीवापाड जपायला हवा.” असं त्यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं होतं.