छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास दोन गटात राडा झाला आहे. किराडपुरा भागातील राममंदिराजवळ काही तरुणांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर हा प्रकार घडला. यावेळी काही तरुणांनी पोलिसांच्या वाहनांसह इतर खासगी गाड्यांना आग लावली. तसेच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचंही बघायला मिळालं. या प्रकारानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नामांतराचा मुद्दा घेऊन जेव्हा आंदोलनकर्त्यांनी औरंगजेबाचे फोटो झळकावले. तेव्हाच त्यांना सोलून काढायला हवं होतं. तेव्हा कारवाई केली असती तर त्यांना जरब बसली असती. आता अॅक्शनची गरज आहे, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली. याबाबतचं ट्वीट मनसेच्या अधिकृत अकाऊंटवरून करण्यात आलं आहे.

हेही वाचा- “दंगलीतील काही युवकांना हैदराबादहून…”, छत्रपती संभाजीनगरमधील राड्यावर संजय शिरसाटांचं विधान

संबंधित ट्विटमध्ये बाळा नांदगावकर म्हणाले, “छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या आंनदास ठपका लावणारी घटना घडली. तिथे जमलेल्या जमावाने राम मंदिर परिसरात जोरदार दगडफेक केली. पोलिसांची १२ वाहनं जाळण्याची यांची हिंमत झाली. हिंदू धर्मीय शांत जरी असले, तरी षंढ नक्कीच नाहीत. राज्य सरकार वारंवार सांगतंय की, हे हिंदुत्ववादी सरकार आहे.

“मग हिंदुंचे सरकार असूनही असं करण्याची हिंमत होते, कारण आपण नुसतं बोलतो. आता अॅक्शनची गरज आहे. अलीकडेच नामांतराचा मुद्दा घेऊन या ‘शांतीदूतांनी’ त्या ‘औरंग्या’चे फोटो झळकावले. त्यांना तेव्हाच सोलून काढलं असतं तर त्यांच्यावर जरब बसली असती. आताही केवळ गुन्हे दाखल करून नव्हे तर, येथून पुढे असं करण्याची हिंमत होणार नाही, अशी जिरवली पाहिजे. पक्ष म्हणून जिथे जिथे हिंदू धर्मीय अडचणीत असेल, तिथे मनसे खंबीरपणे तुमच्याबरोबर असेल…” असं मनसेनं जारी केलेल्या निवेदनात नांदगावकर म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader bala nandgaokar reaction over violence in chhatrapati sambhajinagar ramnavami rmm
First published on: 31-03-2023 at 19:41 IST