राज्यातील राजकारणात मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि मनसे यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पक्ष भाजपाची बी टीम, असा आरोप शिवेसेनेने केला होता. त्याला मनसेच्या नेत्यांनी प्रत्युत्तरही दिलं आहे. आता दसरा मेळाव्यासाठी केलेल्या एका बॅनवरुन मनसे नेते गजानन काळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

“राष्ट्रवादीची उपशाखा असलेल्या नवाबसेनेने शिवतीर्थावरच्या टोमणे मेळाव्यासाठी हिंदुत्वाची वज्रमुठ असे बॅनर प्रकाशित केलं आहेत. नवाबसेनेच्या नवाबप्रमुखांनी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची भाषणे, मुलाखती आणि पत्रकार परिषदा परत ऐकाव्यात. नसतील तर पाठवले जातील,” असा टोमणा काळे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

eknath shinde devendra fadnavis
सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्यालाच जिवंत राहायचंय? शिंदे गटाचा संतप्त सवाल; नेमकं प्रकरण काय?
What Jayant Patil Said?
भाजपासह सत्तेत जायचं हा निर्णय शरद पवारांचा की अजित पवारांचा ? जयंत पाटील म्हणाले, “राष्ट्रवादीत…”
rohit pawar and udayanraje bhosale
साताऱ्यात घड्याळ विरुद्ध तुतारी लढत होणार? रोहित पवारांचं महत्त्वाचं भाष्य; म्हणाले, “उदयनराजे…”
jayant patil and ajit pawar
अर्थसंकल्पातील तरतुदींवरून जयंत पाटील आक्रमक; सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हणाले, “बाटाचा बूट…”

हेही वाचा – “अंबादास दानवे बारावे राखीव खेळाडू”, मनसेने उडवली खिल्ली; म्हणाले, “शिवसेना राष्ट्रवादीची…”

“दुतोंडी सेना म्हणून महाराष्ट्रातील जनता…”

“सत्तेत असताना हिंदुत्वाला बगल द्यायची. हिंदुत्व गुंडाळून ठेवायचं आणि काँग्रेस राष्ट्रवादीची लाचारी करायची. सत्ता गेल्यानंतर हिंदुत्वाची उपरडी नवाबसेनेला आली आहे. दुतोंडी सेना म्हणून महाराष्ट्रातील जनता आपल्याला ओळखत आहे,” अशी टीकाही गजानन काळे यांनी शिवसेनेवर केली आहे.