scorecardresearch

“सुषमा अंधारेंच्या मेंदुला…” राज ठाकरेंवरील टीकेला प्रत्युत्तर देताना मनसे नेत्याची जीभ घसरली!

सुषमा अंधारेंवर टीका करताना मनसे नेत्याची जीभ घसरली आहे.

“सुषमा अंधारेंच्या मेंदुला…” राज ठाकरेंवरील टीकेला प्रत्युत्तर देताना मनसे नेत्याची जीभ घसरली!
फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम

उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची गुरुवारी मुलुंड येथे जाहीर सभा झाली. महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून त्यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. काहीजण ‘उठ दुपारी, घे सुपारी’ असे लोकं आहेत, अशी टीका केली. शिवाय राज ठाकरेंचा शिवतीर्थ बंगला बांधायला पैसे कुठून आले, याबाबतही सवाल विचारले. सुषमा अंधारेंच्या टीकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सुषमा अंधारेंवर टीका करताना प्रकाश महाजनांची जीभ घसरली आहे. सुषमा अंधारेंना बोलायला ठेवलं आहे, भुंकायला नाही. त्यांच्या मेंदुला नारू झालाय का? असा सवाल महाजनांनी विचारला आहे. तसेच राज ठाकरेंवर बोलण्याआधी त्यांनी आपल्या मालकाला याबद्दल विचारलं पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला. ते ‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा- “बाबासाहेब पुरंदरेंच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर…”, राज ठाकरेंच्या भेटीनंतर जयसिंगराव पवारांचा मोठा खुलासा

यावेळी प्रकाश महाजन म्हणाले, “काल सुषमा अंधारेंची सभा झाली. या बाईला काय बोलावं? हेच कळत नाही. मी बीड जिल्ह्यातला आहे, त्याही बीड जिल्ह्यातल्या आहेत. तिला बोलायला ठेवलं आहे, भुंकायला नाही. त्यांच्या मेंदूला नारू झाला का? राज ठाकरेंवर बोलण्याआधी त्यांनी आपल्या मालकाला विचारलं पाहिजे?” अशी टोलेबाजी त्यांनी केली.

हेही वाचा- “शिवरायांच्या प्रेमाचे स्वार्थी उमाळे येणाऱ्या शरद पवारांनी…”, शिंदे गटाचा खोचक टोला; कवितेतून ठाकरे गटालाही केलं लक्ष्य!

कृष्णकुंज बंगल्याबाबत विचारलेल्या सुषमा अंधारेंनी विचारलेल्या सवालावर महाजन म्हणाले, “माझे नेते व्यवसाय करतात. शासनाचे सर्व नियम पाळून व्यवसाय करतात. ते भरपूर प्राप्तीकर भरतात. त्यांनी टोपल्याखाली झाकून बंगला बांधला नाही. पण त्यांनी मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की, मातोश्री क्रमांक २ कशी बांधण्यात आली. १२६ कोटी बापाचे आणि ११ कोटी मुलाचे हे पैसे कुठून आले? ते काय धंदा करत होते का?” असा सवाल महाजनांनी विचारला.

हेही वाचा- “ब्राह्मणांनो परिसर सोडा आणि शाखेत…”, ‘जेएनयू’मध्ये ब्राह्मणविरोधी घोषणांनी भिंती रंगल्या, चौकशी सुरू

“नव्यान मुसलमान झाल्याने ती बाई (सुषमा अंधारे) दिसेल त्याला ‘अदब अदब’ करत सुटली आहे. त्या एक स्त्री आहेत म्हणून आम्ही गप्प आहे. यापुढे राज ठाकरेंवर बोलताना जपून बोलावं. आम्हाला तुमचं सगळंच माहीत आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेत पुरुषांचं बंड झालं. आता राहिलेल्या शिवसेनेत बायकांचं बंड होणार आहे. कारण सुषमा अंधारेंमुळे इतके दिवस उजेडात असलेल्या सर्व शिवसेनेच्या बायका अंधारात गेल्या आहेत. त्या आता गप्प बसणार नाहीत. भविष्यात उद्धव ठाकरेंना बायकांच्या बंडाला तोंड द्यायची तयारी करावी लागेल” असा टोला प्रकाश महाजनांनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 15:42 IST

संबंधित बातम्या