scorecardresearch

“राजकारणातील उर्फी जावेद आणि राखी सावंतच…”, प्रकाश महाजन यांचा खोचक टोला

“एवढे दिवस महिला वर्ग म्हणायचा दुशासनाने द्रौपदीचं वस्त्रहरण केलं, मग…”

“राजकारणातील उर्फी जावेद आणि राखी सावंतच…”, प्रकाश महाजन यांचा खोचक टोला
उर्फी जावेद प्रकाश महाजन ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

उर्फी जावेद अभिनय करते का अंगप्रदर्शन हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. ज्याला पाहायचं त्यांनी पाहावं, ज्यांना पाहायचं नाही पाहू नये. पण, उर्फी जावेदच्या आडून एका पक्षाची महिला नेता, अन्य महाराष्ट्रातील महिलांचं वस्त्रहरण करत आहे. आपल्या फेसबूकवर फोटो टाकत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केला आहे. ते परळीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“एवढे दिवस महिला वर्ग म्हणायचा दुशासनाने द्रौपदीचं वस्त्रहरण केलं. मग, सुषमा अंधारेंनी काय केलं आहे. फेसबूकवर काय फोटो टाकले आहेत. तरी आम्ही महिलांविषयी बोलायचं नाही. एक महिला दुसऱ्या महिलेचे फोटो टाकते. म्हणजे तुम्हाला नक्की म्हणायचं काय आहे. एखाद्या पक्षाचा एवढा वाईट काळ येतो की ‘बंदे भी खुदा हो जाते है’”, असा टोला प्रकाश महाजन यांनी शिवसेनेला लगावला आहे.

प्रकाश महाजन यांनी संजय राऊत यांचाही समाचार घेतला आहे. “संजय राऊत काय बोलत आहेत. कसं शिव्या देत आहेत. आम्ही त्यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा आहे. अजित पवारांची लिफ्ट पडली आणि धनंजय मुंडेंचा अपघात झाला हा जादूटोणा आहे, असं ‘सामना’त छापलं. आता आम्ही कोणावर टीका करायची. संपादक तर महिला असल्याने त्यांच्यावर टीका नाही करायची. तुम्ही असं ‘सामना’त झापल्यावर तुमच्यावर टीका होणार. टीका करताना भाषेची सभ्यता आणि सुसंस्कृतपणा पाळण्यात यावा,” असा सल्ला प्रकाश महाजन यांनी संजय राऊतांना दिला.

“उर्फी जावेद कोणत्या मजबुरीने कपडे काढत असेल, तिला माहिती. मात्र, तुम्ही सुसंस्कृत असून खासदार आणि प्राध्यापक आहात. तुमची भाषा कशी पाहिजे होती. त्यामुळे नाईलाजाने त्यांच्या नेत्यावर टीका करावी लागते. आमची इच्छा नसते, त्यांच्या नेत्यावर टीका करण्याची. पण, हे लोकं आमच्या नेत्यावर टीका करतात, तेव्हा हा प्रयत्न होणार. उर्फी जावेदला एकवेळेस क्षमा करेल, पण, राजकारणातील उर्फी जावेद आणि राखी सावंतच काय करायचं कळेना,” असा टोमणाही राऊत आणि अंधारेंना महाजन यांनी लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 19:48 IST

संबंधित बातम्या