महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श होते, असं विधान केलं. तसेच त्यांनी शिवाजी महाराजांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी केली. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनीही राज्यपालांवर टीकास्र सोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यपालांच्या विधानाचा निषेध करताना वसंत मोरे म्हणाले, “एवढ्या मोठ्या उच्च पदावर असणारी व्यक्ती अशा प्रकारे बेताल वक्तव्य करत आहे. यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारची वक्तव्यं केली होती. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले किंवा छत्रपती शिवाजी महाराज या महापुरषांना आपण आदर्श मानतो. अशा व्यक्तींच्या बाबतीत राज्यपाल महोदय अशी बेताल वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न मला पडतो.”

हेही वाचा- “…तर माझा कार्यक्रम आटोपला असता” श्रद्धांजली वाहावी लागली असती म्हणत गुलाबराव पाटलांचं मोठं विधान

“त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेते राज्यपालांना समज का देत नाहीत? त्यांनी राज्यपालांना काहीतरी समजावून सांगितलं पाहिजे. छत्रपती शिवाजीमहाराज हे आमच्या अस्मिता आहेत. शिवाजीमहाराज महाराष्ट्रातील मराठी मनाचा मानबिंदू आहेत. ते केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानचे मानबिंदू आहेत. असं असताना एखादी व्यक्ती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी कसा काय करू शकते? हे नेहमी कळ लावायचं काम करतात. त्यामुळे त्यांचं नाव ‘कळीचा नारद’ ठेवायला हवं” असंही वसंत मोरे म्हणाले.

हेही वाचा- “छत्रपतींनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली” भाजपा नेत्याचं मोठं विधान, आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…

वसंत मोरे पुढे म्हणाले की, प्रत्येक वेळी कोणत्या तरी जातीधर्माबद्दल बोलायचं. जर गुजराती-मारवाडी मुंबईत नसते, तर मुंबईत काहीही राहिलं नसतं. त्यांनी एखाद्या जातीपातीबाबत अशा प्रकारची बेताल वक्तव्य करणं बंद करावं. राज्यपालांचं वय झालं आहे. आता त्यांना निवृत्ती दिली पाहिजे, असं मला वाटतं. पण त्यांना निवृत्त का दिली जात नाही? कुणाचे हात तिथे अडकलेत? निर्णय घ्यायला कोण कचरतंय हेच मला कळत नाही” अशी टीका वसंत मोरेंनी केली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader vasant more on governor bhagatsingh koshyari shivaji maharaj offensive statement rmm
First published on: 20-11-2022 at 14:07 IST