महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार प्रमोद(राजू) पाटील यांनी शिवसेना(ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे हे सध्या महाराष्ट्रभर शिवसंवाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी नाशिकमध्ये असताना भाषणा दरम्यान ब्ल्यू प्रिंटचा उल्लेख करत मनसेवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता डोंबिवलीमधील मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

“२५ वर्ष आपलीच सत्ता असणाऱ्या आजोळची(डोंबिवली) दुर्दशा कधी पाहिली? कुठलंही काम न करता % वारी व करून दाखवलं बाता हाच ‘गोठलेल्यांचा’ स्वभाव. त्यामुळे ‘शिल्लकांनी’ नको तिथे बोटं खुपसू नयेत. नाहीतर बाळासाहेबांच्या विचारांसोबत जो नडला त्याला फोडला ही हिंमतही आमच्यात आहे.” असं आमदार राजू पाटील यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

What Ajit Pawar Said?
“द्रौपदीचा विचार करावा लागतो की काय?”, मुलींच्या जन्मदरावर बोलताना अजित पवार काय बोलून गेले?
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
praniti shinde question photos of pm narendra modi
खतांच्या बॅगांवर मोदींचा फोटो, आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांना खत विकत घेणे मुश्किल; प्रणिती शिंदे संतापल्या
aam aadmi party protest kolhapur marathi news
ईडीच्या नावाने बोंब मारून कोल्हापुरात केजरीवालांच्या अटकेचा निषेध; आपची प्रतीकात्मक होळी

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“मी नाशिकमध्ये येत-जात असतो. मागील अनेक वर्षांपासून मी या शहरात येतो. माझ्या आजोबांसोबत, वडिलांसोबत मी आलेलो आहे. नाशिक हे माझं आवडतं शहर आहे. नाशिक आणि कोल्हापूर ही दोन शहरं हिरवीगार राहिलेले आहेत. ही शहरं चांगली प्रगत, शांत आणि हिरवीगार राहिलेली आहेत. मात्र मला एक भीती वाटत आहे की मागील १० वर्षांमध्ये नाशिक शहर प्रगतीच्या बाबतीत कुठेतरही हरवलेले होते. अगोदर ब्ल्यू प्रिंट आली, ती कुठे गेली समजली नाही. नंतर नाशिक शहराला कोणीतरी दत्तक घेतले. त्या योजनेचे काय झाले.” अशी खोचक टीका आदित्य ठाकरेंनी केली.

हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या सभेत दगडफेकीच्या घटनेवरून अंबादास दानवेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप, म्हणाले…

आगामी पालिका निवडणुका तसेच विधानसभा निवडणूक लक्षात घेता पक्षविस्तारासाठी आदित्य ठाकरे राज्यभार दौरा करत आहेत. ते नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात शिंदे गट, भाजपासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही कठोर शब्दांत टीका केली.