scorecardresearch

मनसे आमदार राजू पाटील यांचा खासदार श्रीकांत शिंदेंना सुचक इशारा; म्हणाले, “कल्याणचा खासदार यापुढे…”

मनसेच एकमेव आमदार राजू पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना खासदाकीवरून सुचक इशारा दिला आहे.

मनसे आमदार राजू पाटील यांचा खासदार श्रीकांत शिंदेंना सुचक इशारा; म्हणाले, “कल्याणचा खासदार यापुढे…”
राजू पाटील (मनसे)

मनसेच एकमेव आमदार राजू पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना खासदाकीवरून सुचक इशारा दिला आहे. यापुढे मनसेच्या मदतीशिवाय कोणीही कल्याणचा खासदार होऊ शकणार नाही, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी घराणेशाहीवरून शिंदे गटावर टीका केली आहे.

हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना गुरुमंत्र, म्हणाले, “अजितदादा जसे १०-१२ कारखाने चालवतात…”

नेमकं काय म्हणाले राजू पाटील?

“मी आमदारकीलाही उभं राहणार नव्हतो. मात्र, राज ठाकरेंनी म्हटल्यामुळेच मी उभं राहिलो. जर त्यांनी सांगितलं खासदारकीला उभा राहा, तर ती निवडणूकही लढवेन. पण एक गोष्ट निश्चित आहे, की यापुढे कल्याणचा खासदार जो कोणी खासदार होईल, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याला मनसेची मदत घ्यावीच लागेल. मनसेच्या मदतीशिवाय कल्याणमध्ये कोणीही खासदार होऊ शकणार नाही”, अशी प्रतिक्रिया मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा – शिवसेना कार्यकर्त्यांवरील गुन्हा रद्द करण्याची सोमय्या यांची मागणी

“शिदे गटात घराणेशाही नवीन नाही. हे आपण गेल्या अनेक वर्षांपासून बघतो आहे. मात्र, प्रत्येक पक्षाने हे लक्षात ठेवायला हवं, की केवळ घरातले नाही, तर कार्यकर्त्यांनाही संधी द्यायला हवी. दरम्यान, शिवसेना आणि ठाकरे गटातील वादावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. दोन्ही गटात असंतोष दिसतो आहे. हे मराहाराष्ट्राच्या राजकीय भविष्याच्या दृष्टीने योग्य नाही”, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या