Raj Thackeray : विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे २३ नोव्हेंबरच्या दिवसाकडे अनेकांचे लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. सध्या राज्यभरात विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा सुरु आहेत. या सभांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचंही पाहायला मिळत आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील वरळी मतदारसंघात जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच यावेळी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदीवरचे भोंगेंच्या विषयावरून मोठं भाष्य केलं आहे. “सत्ता हातात द्या, पहिल्या ४८ तासांत मशिदीवरचे भोंगे काढतो”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

“उद्धव ठाकरे कसे मुख्यमंत्री झाले हे सर्वांना माहिती आहे. सध्याच्या काळात काहीही विचारधारा उरलेली नाही. २०१९ नंतर कोणाचं सरकार येणार? हेच आपण पाहत बसलो होतो. एकेदिवशी सकाळी ६ वाजता कळलं की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे शपथ घेत आहेत. आधी तर विश्वासच बसला नाही. आर्धा तास ते लग्न टिकलं. आर्ध्या तासाच घटस्फोट झाला. त्यानंतर लगेच उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर गेले. मग यांना काही जणाची नाही आणि मनाची नाही. ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्या बरोबर सत्तेत जाऊन बसले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अडीच वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक बॅनर्सवरील नावापुढंचं हिंदूहृदयसम्राट हे नाव काढलं. हे का काढलं तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला वाईट वाटेल आणि त्यांना ते परवडणारं नाही. तसेच काही उर्दू बॅनर्सवर जनाब बाळासाहेब ठाकरे नाव टाकलं. आज ते हयात असायला हवे होते. त्यांनी एकएकाला फोडून काढलं असतं”, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

Uddhav Thackeray On Amit Thackeray
Uddhav Thackeray : अमित ठाकरेंच्या विरोधात माहिममध्ये सभा घेणार का? उद्धव ठाकरे म्हणाले, “मला आवश्यकता…”
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
Raj Thackeray in ghatkopar
Raj Thackeray in Ghatkopar : “नालायक ठरलो तर…”, राज ठाकरेंचं मतदारांना आवाहन; म्हणाले, “सत्ता नसताना…”
Ajit Pawar group Dilip Walse Patil Politics
Dilip Walse Patil : विधानसभेनंतर राजकीय समीकरणे बदलणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं सूचक विधान; म्हणाले, “काही गणितं…”

हेही वाचा : विधानसभेनंतर राजकीय समीकरणे बदलणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं सूचक विधान; म्हणाले, “काही गणितं…”

“आज काही मौलवी फतवे काढत आहेत. काय फतवे काढत आहेत? तर सर्वच्या सर्व मते हे महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकावी. जर ते फतवे काढत असतील तर आज मी देखील फतवा काढतो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझे ज्या मतदारसंघात उमेदवार असतील तेथे जनतेने आमच्या पाठीशी उभे राहावं. उद्या सत्ता हातात दिल्यानंतर पहिल्या ४८ तासांत सर्व मशिदीवरचे भोंगे पहिल्या पहिल्या ४८ तासांत खाली उतरवले ना? तर परत राजकारण सांगणार नाही. जर त्यांनी अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर हे आमच्या खाकी वर्दीतले आहेत ना त्यांना आदेश देईल आणि ते रजा अकादमीचा बदला घेऊन टाकतील”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Story img Loader