राज ठाकरेंनी आधी गुढी पाडवा मेळावा आणि नंतर ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरूद्ध मनसे असा खडा सामना पाहायला मिळत आहे. विशेषत: राज ठाकरेंना ठाण्यातल्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षातील इतर प्रमुख नेत्यांवर तोफ डागल्यानंतर राष्ट्रवादीकडून देखील त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. खुद्द शरद पवारांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन बाबासाहेब पुरंदरे, जेम्स लेनचं पुस्तक आणि जातीपातीचं राजकारण यासंदर्भात राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं होतं. यानंतर आता मनसेकडून २००३ साली बाबासाहेब पुरंदरे आणि देशातील इतर नामांकित इतिहासकारांनी लिहिलेलं एक पत्रच जाहीर करत शरद पवारांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

शरद पवार काय म्हणाले?

जेम्स लेनसंदर्भात राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना शरद पवारांनी त्यावर बुधवारी बोलताना भूमिका मांडली आहे. “जेम्स लेननं केलेल्या लिखाणात त्याचा आधार म्हणून बाबासाहेब पुरंदरेंकडून ही माहिती घेतली असं म्हटलं होतं. एखाद्या लेखकानं गलिच्छ प्रकारचं लिखाण केलं आणि त्याला माहिती देण्याचं काम पुरंदरेंनी केलं. त्याचा खुलासा पुरंदरेंनी कधी केला नाही. म्हणून त्यांच्यावर टीका-टिप्पणी केली असेल, तर मला त्याचं दु:ख वाटत नाही तर अभिमान वाटतो. त्यामुळे याबाबत कुणी काय म्हटलं असेल, तर मला त्याबद्दल फारसं बोलायचं नाही”, असं शरद पवार म्हणाले होते.

Sharad Pawar On Eknath Khadse join Bjp
एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशावर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “नाईलाजाने…”
Ajit pawar explaination on controversial statement
“निधी पाहिजे तर कचाकचा बटणं दाबा”, वादग्रस्त विधानानंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण; म्हणाले “सुशिक्षित वर्गाची…”
Sharad pawar udyanraje bhosle satara lok sabha election
उदयनराजेंना महायुतीने डावललं तर तुम्ही तिकीट देणार का? शरद पवारांनी कॉलर उडवत दिलं उत्तर…
Sanjay Raut ANI
संजय राऊत यांचा रोख कुणाकडे? “सांगलीतून कुणाला अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करायची असेल..”

दरम्यान, यावर आता मनसेकडून बाबासाहेबांनी १० नोव्हेंबर २००३ रोजी ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला लिहिलेलं एक पत्र जाहीर करण्यात आलंय. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हे पत्र समोर आणलं असून त्यासंदर्भात माध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. “मला वाटतं हे पत्र स्वयंस्पष्ट आहे. जे काल शरद पवार म्हणाले होते की बाबासाहेब पुरंदरेंनी याबाबत कुठेही काही म्हटलं नाही, त्यावर हे पत्र स्वयंस्पष्ट आहे. त्यांच्या भावना या पत्रात बाबासाहेबांनी व्यक्त केल्या आहेत. या पत्राची कल्पना १०० टक्के राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. तरीही भांडणं लावण्याचा प्रयत्न केला गेला. राज ठाकरे भाषणात जे म्हणाले की राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून जातीजातींत भांडणं लावण्याचं काम करण्यात आलं आहे, त्याचा ढळढळीत पुरावा या पत्रापेक्षा दुसरा कुठला असू शकत नाही”, असं देशपांडे म्हणाले.

काय लिहिलंय या पत्रात?

एका शिवप्रेमीने आपल्याला हे पत्र पाठवल्याचं देशपांडे म्हणाले. या पत्रात नमूद करण्यात आलेला मजकूर देखील त्यांनी वाचून दाखवला. “ज्यांच्यावर कोट्यवधी भारतीयांचं प्रेम आहे, त्यांच्याबद्दलचे निराधार आरोप आम्ही सहन करणार नाही. जेम्स लेन यांनी त्यांच्या पुस्तकात हेच केलं आहे. हे पुस्तक तुमच्याकडून प्रकाशित होत आहे. शिवाजी महाराज आणि दादोजी कोंडदेवांविषयी जेम्स लेननं जे विधान केलंय, ती त्याच्या घाणेरड्या मनोवृत्तीची उत्पत्ती आहे. त्यामुळे प्रकाशक आणि लेखकांनी २५ नोव्हेंबर २००३ पर्यंत कोट्यवधी भारतीयांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागावी आणि हे पुस्तक भारत आणि परदेशातूनही मागे घ्यावं. जर प्रकाशक आणि लेखकानं असं काही केलं नाही, तर भारत सरकारने या पुस्तकावर बंदी घालावी आणि त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती आम्ही करू”, असं या पत्रातून बाबासाहेब पुरंदरे आणि इतर इतिहासकारांनी ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला सांगितल्याचं संदीप देशपांडे म्हणाले.

“वर्ष-सहा महिन्यात एखादं वाक्य बोलून…”, राज ठाकरेंच्या उत्तर सभेला शरद पवारांचं प्रत्युत्तर!

“आता तर ही माहिती समोर आलीये”

“त्यांनी म्हटलं होतं की माझ्याकडे यासंदर्भात माहिती नाही. आता माहिती समोर आली आहे. हे पत्र त्यांनी बघावं. जर त्यांना वाटलं की चूक झाली आहे, तर महाराष्ट्राची त्यांनी माफी मागितली पाहिजे”, असं संदीप देशपांडे म्हणाले.