राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. भाजपाची ४०० पारची घोषणा, नाशिक लोकसभेची उमेदवारी आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातली राज्यसभा अशा विविध मुद्द्यांवर भुजबळ यांनी महायुती आणि स्वपक्षालाच खडे बोल सुनावले आहेत. तसेच टीव्ही ९ या वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना त्यांनी राज ठाकरेंवरही भाष्य केले. “राज ठाकरेंनी शिवसेना का सोडली? त्यांचे नेमके कशावरून मतभेद झाले? शिवसेना सोडून त्यांनी चूक केली”, अशी विविध विधाने भुजबळ यांनी केल्यानंतर आता मनसेकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना भुजबळांचा समाचार घेतला. “छगन भुजबळ कोणत्या संदर्भात बोलले याचे कारण आम्हाला उमजले नाही. भुजबळांनी या विषयावर बोलण्याचे आज कारण काय होते? भुजबळांनी नाशिकमध्ये फार मोठी नॉलेज सिटी काढली, पण भुजबळांचे नॉलेज कमी आहे. १९९३ साली १७ ते १८ आमदार घेऊन भुजबळच पहिल्यांदा बाहेर पडले. बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम भुजबळांनीच पहिल्यांदा केले. बाळासाहेबांना टी. बाळू बोलण्याची सुरुवात भुजबळांनीच केली. बाळासाहेबांचे वय न पाहता त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. आज कोणत्या तोंडाने भुजबळ राज ठाकरेंवर आरोप करत आहेत?”, असा सवाल प्रकाश महाजन यांनी उपस्थित केला.

multifacility, first yatra ST bus stand, maharashtra state road transport corporation, Pandharpur
एसटीचे राज्यातील पहिले यात्रा बसस्थानक उभे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करणार
Congress MLA Hiraman Khoskar On Nana Patole
काँग्रेसमध्ये धुसफूस! “नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार…”, हिरामण खोसकरांचं मोठं विधान
what sanjay Raut Said About Shankaracharya ?
“शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना आशीर्वाद दिला म्हणून…”, संजय राऊत यांचं वक्तव्य
congress mla suspension
“बेईमानी करणाऱ्यांसाठी ट्रॅप लावला होता, त्यात ते अडकले”, काँग्रेसच्या ‘त्या’ ७ आमदारांवर कारवाई होणार; अभिजीत वंजारींची माहिती!
MP Nilesh Lanke On DCM Ajit Pawar
“आता शिळ्या कढीला…”, निलेश लंकेंचा अजित पवारांना खोचक टोला
Jitendra-Awhad_
Maharashtra News Live : “अजित पवार महायुतीत शोभत नाहीत, कारण…”, जितेंद्र आव्हाडांचं विधान चर्चेत!
Jayant Patil On NDA Aghadi Government
“चार महिन्यांत केंद्रातील सरकार…”, शेकापचे नेते जयंत पाटील यांचं मोठं विधान
Maharashtra police Bharti latest marathi news
तरुणांसाठी खुशखबर: राज्यात पुन्हा ७ हजार पदांसाठी पोलीस भरती
Koyna valley land misappropriation marathi news,
कोयना जमीन गैरव्यवहाराची हरित लवादाकडून दखल, सातारा जिल्हाधिकाऱ्यांसह पाच जणांना नोटिस

छगन भुजबळांचा राज ठाकरेंना सवाल, “बाळासाहेब आणि तुमचं रक्ताचं नातं, मग तुम्ही..”

“राज ठाकरे यांनी कधीही पक्ष फोडायचे काम केले नाही. त्यांचे काही तात्विक आणि अंतर्गत मतभेद झाले. बाळासाहेबांना हे मतभेद सांगून त्यांचा आशीर्वाद घेऊन राज ठाकरे बाहेर पडले. कुणालाही बाहेर पडून नवा पक्ष काढण्याचे स्वातंत्र्य आहे. पण भुजबळांना आज विषय काढण्याचे कारण काय होते? भुजबळ जेव्हा राजकीय अडचणीत येतात, तेव्हा ते तात्विक मुलामा देण्याचा प्रयत्न करतात. पण भुजबळांनी आता तरी खरे बोलावे. दिवंगत नेते मनोहर जोशींना मुख्यंमत्री केले, ही भुजबळांची खरी पोटदुखी होती”, असा आरोप प्रकाश महाजन यांनी केला.

प्रकाश महाजन पुढे म्हणाले, शिवसेनेत कधीही जात पाहिली जात नव्हती. मंडल आयोगाचा विषय पुढे करण्याचे कोणतेही कारण नव्हते. भुजबळ आज वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांची सद्सदविवेकबुद्धी हरवल आहे. लोकसभेला शब्द देऊनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही आता राज्यसभाही गेली. प्रचंड माया जमवल्यामुळे त्याच्या केसेस सुरू आहेत, अशीही टीका प्रकाश महाजन यांनी केली.

वक्फ बोर्डाला सरकारने मदत करू नये

वक्फ बोर्डाला सरकारने कोणत्याही प्रकारचा निधी देऊ नये. कारण त्या बोर्डाने जर कुठला अन्याय केला तर त्या संदर्भात दाद मागण्याची कुठल्याही न्यायालयात तरतूद नाही. तसेच सर्वाधिक जमीन ही वक्फ बोर्डाकडे आहे. ही जमीन आदिवासी, दलित बहुजन समाजाची आहे. त्यांच्यावर जर कोणता अन्याय झाला तर त्यांना पुन्हा वक्फ बोर्डाकडेच न्याय मागावा लागतो. त्यामुळे वक्फ बोर्ड योग्य ज्ञान देऊ शकत नाही. म्हणून सरकारने वक्फ बोर्डाला कोणतीही मदत करू नये, अशीही मागणी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे.