scorecardresearch

दिव्यांग कबड्डीपटूच्या घरी अमित ठाकरे पंगतीला बसून जेवले; पालघर दौऱ्यातील Video चर्चेत

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे सध्या पालघर आणि ठाणे जिल्ह्यांच्या सात दिवसीय दौऱ्यावर आहेत.

दिव्यांग कबड्डीपटूच्या घरी अमित ठाकरे पंगतीला बसून जेवले; पालघर दौऱ्यातील Video चर्चेत
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे सध्या पालघर आणि ठाणे जिल्ह्यांच्या सात दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज सकाळी बोईसर आणि दुपारी डहाणू येथे त्यांनी शेकडो महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांच्याशी तसंच पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

विशेष म्हणजे, दुपारचे जेवण त्यांनी डहाणू तालुक्यातील नरपड मांगेला समाज वाडीतल्या सचिन हरिश्चंद्र तांडेल या पायाने अधू असलेल्या कबड्डीपटूच्या घरी केले. यावेळी अमित ठाकरे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसमवेत पंगतीत बसून जेवण केलं आहे. तांडेल कुटुंबियांच्या घरचा कोंबडीचा रस्सा खूप आवडल्याचंही अमित ठाकरे यांनी आवर्जून सांगितलं.

याप्रसंगी अमित ठाकरे यांनी पॅरा कबड्डी (Para Kabaddi) मध्ये राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचा कर्णधार म्हणून कामगिरी बजावणाऱ्या सचिन तांडेल यांच्यासोबत कबड्डीबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच त्यांना मिळालेली सर्व पारितोषिकं बघून कौतुक केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.