scorecardresearch

सांगली: गॅस दरवाढीच्या निषेधार्थ महिला राष्ट्रवादीचे आंदोलन

केंद्र शासनाने घरगुती वापराच्या इंधनवायू दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ शनिवारी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सांगलीत आंदोलन करण्यात आले.

gas

केंद्र शासनाने घरगुती वापराच्या इंधनवायू दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ शनिवारी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सांगलीत आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी रस्त्यावर चुल मांडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध केला.

केंद्र सरकार सातत्याने घरगुती वापराच्या इंधन वायूच्या दरात वाढ करीत आहे. याचा परिणाम सर्व सामान्य लोकांना सोसावा लागत आहे. अगोदरच महागाईने जगणे मुश्किल झाले असताना इंधन दरात होत असलेली वाढ असह्य झाली आहे. याचा आम्ही निषेध करीत आहोत, सरकारने तातडीने इंधनदरात करण्यात आलेली दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी केंद्र व राज्य शासनाविरूध्द घोषणाबाजी करण्यात आली.

या वेळी जिल्हाध्यक्ष सुस्मिता जाधव, छाया जाधव अनिता पांगम ,वंदना चंदनशिवे ,ज्योती आदाटे अलका माने , सुनिता देशमाने नलिनी पवार, सुरेखा कोळेकर माणिकताई माळी ,मृदुला कुलकर्णी , साधना पाटील , प्रतिभा पाटील , यांचेसह सर्व तालुकाध्यक्ष , शहराध्यक्ष जिल्हा कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-03-2023 at 21:01 IST