सातारा: छावा चित्रपटातील आक्षेपार्ह बाबी वगळून तो प्रदर्शित करावा, अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांना केली आहे. छावा चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला जात असल्याने त्यावरून उदयनराजे यांनी उत्तेकर यांच्याशी चर्चा करीत वरील सूचना केली आहे.

उदयनराजे म्हणाले, की आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी राष्ट्रासाठी, धर्मासाठी केलेले योगदान हे चांगल्या पद्धतीने समोर यावे. त्यासाठी हा चित्रपट इतिहास तज्ज्ञ व इतिहास अभ्यासक यांना दाखवून, त्यात काही आक्षेपाई असेल, तर तो भाग वगळून उर्वरित चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित करावा, अशा सूचना उदयनराजे यांनी उत्तेकर यांना सूचना केल्या.

Udayanraje Bhosale angry on actor rahul solapurkar
“… त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावार खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
controversial referee decision at maharashtra kesari event
अन्वयार्थ : कुस्तीच चितपट होऊ नये यासाठी…!
maharashtra cabinet approves rs 315 5 crore for repair leaks in temghar dam
टेमघर धरणाची गळती थांबणार;  जाणून घ्या, गळती रोखण्यासाठी किती कोटींची तरतूद
Meeting of Sindhudurg District Planning Board and Narayan Rane sawantwadi news
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा
Maharashtra Kesari 2025 Kustigir Parishad Offical Sandip Bhondave Statement on Shivraj Rakshe and Mahendra Gaikwad
Maharashtra Kesari 2025: “रिप्लेमध्ये दिसतंय पंचांचा निर्णय चुकलाय पण…”, महाराष्ट्र केसरीमधील वादानंतर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं वक्तव्य
Congress forms panel to monitor ‘conduct of free and fair elections
निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेसची समिती; मतदारयाद्यांमधील घोळाचा आढावा घेण्याचा निर्णय
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?

धर्मरक्षक, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे. छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहेत. मात्र, या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत मते व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखविण्यात यावा. त्याशिवाय प्रदर्शित करू नये, अशी आमची भूमिका आहे. महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल, अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही.

चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीने याबाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह काही असेल, तर काढून टाकले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. – उदय सामंत, मराठी भाषा मंत्री हा चित्रपट इतिहास तज्ज्ञ व इतिहास अभ्यासक यांना दाखविला जाईल. यासाठी उदयनराजेंना निमंत्रित केले जाईल. त्यानंतरही काही सूचना असतील, तर त्यात बदल करून हा चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित केला जाईल. – लक्ष्मण उत्तेकर, चित्रपटाचे दिग्दर्शक

Story img Loader