शिवसेना ही काही निवडणूक आयोगाच्या बापाची नाही, जी निवडणूक आयोगाने कुणाच्याही हाती द्यावी. ही शिवसेना जनतेची आहे. जनतेचा महासागर खेडमध्ये दिसला. एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या गटाचे लोकं भारतीय जनता पार्टीचे लोक लिहून देतात असं म्हणतात खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली. आज शिमगा आहे आणि जनता शिमगा एकनाथ शिंदेंच्या नावाने सुरू आहे अशीही टीका संजय राऊत यांनी केली आहे. एवढंच नाही तर सरकारच्या विरोधात बोललं की हल्ले केले जात आहेत. ईडी, सीबीआय आणि इतर तपास यंत्रणांचा वापर केला जातो आहे विरोधकांना संपवलं जातं आहे असाही आरोप संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचाः संजय राऊत विकृत मनोवृत्तीचे – उदयनराजे
ईडी आणि सीबीआयचा वापर शस्त्रांसारखा केला जातो आहे. त्यामुळे रविवारी प्रमुख विरोधी नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे. राहुल गांधी जे केंब्रिजमध्ये बोलले की लोकशाही धोक्यात नाही तर संपत चालली आहे त्या भूमिकेशी मी सहमत आहे. लोकशाहीचा देशात मुडदा पडला आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना ही टीका त्यांनी केली आहे.
हेही वाचा छत्रपतींच्या वंशजांची राजकारणासाठी तडजोड, शिवगर्जना संपर्क अभियानात संजय राऊत यांची जोरदार टीका
बेळगावह सीमाभाग हा आपण महाराष्ट्राचा मानतो. राजकीय अडचणी असतील, बेळगावमध्ये जाऊन जय महाराष्ट्र म्हणायचं नसेल तर अशा लोकांनी तिथे जाऊच नये असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. खेडमध्ये जी सभा झाली त्या सभेत जनतेचा महासागर दिसला. तो महासागर हेच शिवसेना कुणाच्या तरी हातात देणाऱ्यांना उत्तर आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सगळ्या विरोधकांनी आता एकत्र आलं पाहिजे. तेजस्वी यादव, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल यांच्यासह सगळ्याच विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे. या देशाची लोकशाही वाचवली पाहिजे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.