राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभरातून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करावी तसेच भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनीदेखील कोश्यारी आणि त्रिवेदी यांची हकालपट्टी करावी अशी रोखठोक भूमिका घेतली आहे. असे असले तरी उदयनराजेंच्या भाजपा पक्षातील नेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र कोश्यारी आणि त्रिवेदी यांची पाठराखण केली आहे. याच कारणामुळे उदयनाराजेंची आगामी वाटचाल कशी असणार, असा प्रश्न विचारला जात आहे. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भविष्य पाहिल्याची चर्चा, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “डॉ. नरेंद्र दाभोलकर…”

“मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. जे घडले ते सर्वांनाच माहिती आहे. कोणताही पक्ष असला तरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्त सुधांशू त्रिवेदी यांची हकालपट्टी करावी, अशी माझी भूमिका आहे. माझ्या या भूमिकेत बदल होणार नाही. देवेंद्र फडणवीस या प्रकरणात काय बोलले, ते त्यांनाच विचारावे,” अशी भूमिका उदयनराजे यांनी घेतली.

हेही वाचा >>>“बुद्धी भ्रष्ट झाली? लाज वाटत नाही का?” राज्यपाल, सुधांशू त्रिवेदींच्या विधानानंतर उदयनराजे संतापले, म्हणाले “कशाचा आधार…”

“सर्व नेत्यांना एकाच मंचावर बोलवावे, प्रत्येक पक्षाने कोश्यारी, त्रिवेदी यांनी केलेल्या विधानावर आपली भूमिका स्पष्ट करावी. मी भाजपाचा खासदार आहे. मात्र मी शिवाजी महाराज यांचा वंशज म्हणून बोलत आहे. हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. पक्ष बिक्ष नंतर बघूया,” असेही उदयनराजे भोसले म्हणाले.

हेही वाचा >>> सीमाप्रश्नावरून संजय राऊतांची शिंदे गटावर टीका, दादा भुसेंचेही जशास तसे उत्तर; म्हणाले “आम्ही काल जे होतो…”

“कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्यावर कारवाई होणार की नाही ते पाहावे लागेल. मी या मुद्द्यावर कोणाशीही तडजोड करणार नाही. कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्यावर कारवाई होणार याचा मला विश्वास आहे,” असेही उदयनराजे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp udayanraje bhosale comment on devendra fadnavis and bjp support ot bhagatsingh koshyari and sudhanshu trivedi prd
First published on: 24-11-2022 at 13:57 IST