scorecardresearch

दोन दिवसात प्रश्न सोडवा अन्यथा कोयनेची वीज बंद करणार- उदयनराजेंचा शासनाला इशारा

कोयनानगर येथे सुरू असलेल्या धरणग्रस्त आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.

दोन दिवसात प्रश्न सोडवा अन्यथा कोयनेची वीज बंद करणार- उदयनराजेंचा शासनाला इशारा
खासदार उदयनराजे भोसले फोटो- लोकसत्ता

वाई:कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न साठ वर्षांपासून प्रलंबित आहेत. अनेकदा  डॉ भारत पाटणकर यांनी हा प्रश्न मांडला,कृष्णा खोरे अंतर्गत जेवढी धरणे झाली त्यात धरणग्रस्तांचा मोठा त्याग आहे,.त्यांच्यामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे, कोयना प्रकल्पग्रस्तांचा व कृष्णा खोरे प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न दोन दिवसात सोडवा अन्यथा कोयनेची वीज बंद करणार असल्याचा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी शासनाला दिला आहे

कोयनानगर येथे सुरू असलेल्या धरणग्रस्त आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. गेली ६० वर्षे या प्रकल्पग्रस्त जनतेचा आवाज कोणी ऐकला नाही परंतु यापुढे अस होणार नाही. डॉ भारत पाटणकर यांच्या खांद्याला खांदा लावून यापुढे मी ही लढाई तुमच्या साथीने लढणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर  लवकरच या बाबतीत बैठक लावून हा प्रश्न कायम स्वरुपी निकाली काढण्याचा प्रयत्न असेल.

हेही वाचा >>> कोल्हापूर : सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या पाठीत काठी – राजू शेट्टी

त्यानंतर ही काही तोडगा नाही निघाला तर शेवटचा पर्याय हा असेल की ज्या धरणग्रस्थानच्या व कोयना धरण च्या जीवावर संपूर्ण राज्य आज प्रगतीपथावर आहे त्या धरणाची सूत्र हाती घेण्यास आम्हास वेळ लागणार नाही.दोन दिवसात प्रश्न सोडवा अन्यथा कोयनेची वीज बंद करणार असल्याचा इशारा उदयनराजेंनी दिला. या आंदोलनात कोयना  पाटण आणि सातारा तालुक्यातील प्रकल्पग्रस्त आंदोलन सहभागी झाले आहेत.

,एका बाजूला धरण तर दुसर्‍या बाजूला पुर्नवसन हा निर्णय घेतला पाहिजे होता.  भोळ्याभाबड्या जनतेने आपल्या जामीन देऊन त्याग केला. आज सहा तप गेले पण न्याय नाही मिळाला यामुळे तुमची प्रगती झाली पण त्यांची प्रगती थांबली .भारत पाटणकर यांनी शासनाकडे अनेकदा व्यथा मांडली, प्रत्येक वेळी आश्वासन आश्वासन देण्यात आले.आपला भविष्यकाळासाठी हे झालं पाहिजे यासाठी मी व डॉ. भारत पाटणकर आवाज उठवित आहे. अनेक आंदोलने झाली. इतर धरणांचे प्रश्न मार्गी लागत आहेत, मात्र महाराष्ट्राचा कणा असलेल्या कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत, अशी खंत खासदार उदयनराजे यांनी  व्यक्त केली.

हेही वाचा >>> “रडवणाऱ्या कांद्यावर रोटर फिरवण्यासाठी तरी अनुदान द्या!” महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या मुलाचं थेट राष्ट्रपतींना पत्र

कोयना, तारळी, वांग-मराठवाडी, उरमोडी वाटत कब्जा हक्केचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द झाला पाहिजे व कोयना धरणासह जमीन वाटप लवकरात लवकर झालं पाहिजे. जो पर्यंत जमीन वाटप होत नाही तोपर्यंत जीव गेला तर बेहात्तर पण आता माग हटणार नाही. अशी प्रतिक्रिया प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली आहे.अधिवेशन सुरू आहे, निश्चीतपणे मी शासनाशी चर्चा करणार आहे. आमचा प्रश्न सोडवा अन्यथा कोयनेची वीज कापा आणि सातारचे नाव राखा. असं आंदोलनातील महिलांनी यावेळी सांगितले.माझी बांधीलकी लोकांशी आहे. मी माझ्या पदाला जास्त महत्त्व देत नाही.  उदयनराजे भोसले म्हणाले. त्यानंतर कोयना प्रकल्पग्रस्तांचा व कृष्णा खोरे प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न दोन दिवसात सोडवा अन्यथा कोयनेची वीज बंद करणार असल्याचा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी शासनाला दिला आहे.यावेळी सुनील काटकर,चैतन्य दळवी, सचिन कदम, महेश शेलार,बळीराम कदम, परशुराम शिर्के ,आनंदा सपकाळ, प्रकाश सोरटे, सीताराम पवार, श्रीपती माने, रामचंद्र कदम,अनुसया कदम, जागुबाई कदम, कमलताई कदम आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 20:03 IST