सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले खासदार विशाल पाटील यांनी कॉंग्रेसचे सहयोगी सदस्यत्व बुधवारी स्वीकारले. यासाठीचे पत्र त्यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिले.

माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्यासोबत खासदार पाटील आजच मुंबईला रवाना झाले होते. मुंबईत प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांची भेट ते घेणार होते. मात्र मुंबईत अधिक वेळ न दवडता आमदार कदम यांनी खासदार पाटील यांना घेऊन थेट दिल्ली गाठली. दिल्लीत खरगे यांची भेट घेऊन कॉंग्रेसला पाठिंबा देत असल्याचे पत्र दिले.

हेही वाचा – कोल्हापुरात नवीन राजवाड्यात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

हेही वाचा – तापमान वाढ रोखण्याचा कोल्हापुरात पर्यावरण दिनी निर्धार

पाटील यांच्या कॉंग्रेसला पाठिंबा देऊन सहयोगी सदस्यत्व स्वीकारल्याने कॉंग्रेसचे राज्यातील संख्याबळ १४ तर देशात १०० झाले आहे. आज सोनिया गांधी राहुल गांधी यांची भेट घेऊन उद्या दोघेही मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेणार आहेत.