scorecardresearch

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू होणार, शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार सहा हजार

केंद्रातील पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात येणार आहे

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू होणार, शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार सहा हजार
राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारचा महत्त्वाचा निर्णय

राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. केंद्रातील पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर राज्यात आता ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या निकषांबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे.

Farmer suicide : कायमस्वरुपी तोडगा काढण्यास सर्वच सरकारांना अपयश आलं, ही वस्तुस्थिती – रोहित पवार

शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी २०१८ मध्ये केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा करण्यात येतात. दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये या पैशांचे शेतकऱ्यांना वितरण केले जाते. अशाचप्रकारची योजना लवकरच महाराष्ट्रात राज्य सरकारकडून लागू केली जाणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mukhyamantri kisan yojna will be implemented in state by shinde fadanvis government rvs

ताज्या बातम्या