मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि लक्झरी बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एका महिलेसह चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. डहाणू तालुक्यातील चारोटीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असेलल्या महालक्ष्मी मंदिराजवळ पहाटे तीन-साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
हेही वाचा – लोकसत्ता विश्लेषण: वाहनाचा अपघात झाल्यास काय कराल? कायदा काय सांगतो? जाणून घ्या…
मंगळवारी पहाटे गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीने लक्झरी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. यात एका महिलेचादेखील समावेश होता. तसेच लक्झरी बसचालकासह अन्य तीन प्रवाशी जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद अब्दुल कलाम सलाम हाफिज (३६), इब्राहिम दाऊद (६०), आशियाबेन कलेक्टर (५७), इस्माईल मोहम्मद देराय (४२), अशी मृतकांची नावे आहेत.
हेही वाचा – विश्लेषण : मुंबई-अहमदाबाद महामार्गाचा पालघर टप्पा मृत्यूचा सापळा?
दरम्यान, स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. विशेष म्हणजे ८ जानेवारी रोजी याच परिसरात झालेल्या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता.