मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आता दुबईचा प्रवेश झाला आहे. महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांना दुबईवरुन दोन फोन आले, असं सांगण्यात येत आहे. हे दोन्ही फोन अधिकाऱ्यांनी उचलले नाहीत. पण याआधी कधीही कोणत्या अधिकाऱ्याला दुबईवरुन फोन आला नसल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे.

याबद्दल आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीच्या सूत्रांनी सांगितलं की फोन टॅप करण्याचा हा प्रयत्नही असून शकतो. रविवारी नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी व्ही.व्ही. सिंग आणि सॅम डिसूझा यांच्यात फोनवर झालेल्या चर्चेची ऑडिओ क्लिप ऐकवली होती. एनसीबीला फोन टॅप झाल्याची शंका येत आहे. याविषयी एनसीबीकडून सांगण्यात आलं की जून २०२१ मध्ये मुंबई पोलीस दलातल्या निवृत्त एसीपींच्या मुलाविरोधात कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे व्ही.व्ही. सिंग यांचा फोन टॅप झाल्याची शक्यता असू शकते.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
dawood ibrahim marathi news, extortion dawood ibrahim marathi news
खंडणीप्रकरणातून दाऊदच्या पुतण्यासह तिघांची निर्दोष सुटका
Brazil Supreme Court judge wants to investigate Elon Musk and X
एलॉन मस्क यांची ‘या’ देशात होणार चौकशी? काय आहे प्रकरण?
Loksatta Lokrang Economist Sanjeev Sanyal Neon Show In this podcast UPSC Exam
विद्यार्थ्यांचा ओढा का?

हेही वाचा – क्रांती रेडकरच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची केस? नवाब मलिकांच्या नव्या ट्वीटने पुन्हा खळबळ

याविषयी नाव जाहीर न करण्याच्या अटीवरुन सूत्राने सांगितले की, जूनमध्ये मुंबई पोलीस दलातल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाकडून LSD चे ४३६ ब्लॉट्स जप्त करण्यात आले आणि त्याला अटकही करण्यात आली. यामुळे तेव्हापासूनच व्हीव्ही सिंग यांचा फोन टॅप होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर सॅम डिसूझाचाही या प्रकरणात समावेश असल्याची शक्यता असू शकते, असं सांगण्यात येत आहे. हे प्रकरण आता वरिष्ठांकडे मांडण्यात आलेलं आहे.

तर भाजपानेही महाराष्ट्र सरकारवर फोन टॅप करण्याचा आरोप केला आहे. भाजपा नेते राम कदम यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की एका मंत्र्यांकडे एनसीबी अधिकाऱ्याने फोनवर केलेली बातचित आलीच कशी? महाराष्ट्र सरकारने ही गोष्ट स्पष्ट करावी नाहीतर असं समजण्यात येईल की सरकारही अवैध फोन टॅपिंगमध्ये सहभागी आहेत.