चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावरील खेड परशुराम घाटात पुन्हा एकदा पाच वाहनांचा अपघात घडल्याने दोन तास वाहातूक बंद ठेवण्यात आली. पाच वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात झाला. गोव्याकडे जाणाऱ्या कंटेनरने घरडा बसला धडक दिली. या अपघातात घरडा कंपनीच्या बसमधील पंधरा ते वीस कर्मचारी जखमी झाले. हा अपघात मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला.

परशुराम घाटात ज्या ठिकाणी संरक्षणभिंत कोसळल्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु आहे. मात्र आज दुपारी दोन वाजता चिपळूण शहरातून घरडा कंपनीचे कर्मचारी घेऊन बस कंपनीकडे निघाली होती. परशुराम घाटात ही बस एकेरी मार्गावर आली असताना समोरून गोव्याकडे जाणारा कंटेनर वेगाने येऊन बसवर आदळला. कंटेनरच्या धडकेने बस लावलेल्या गर्डरवर जाऊन आदळली. तर कंटेनरच्या मागे असणाऱ्या आयशर टेम्पोवर कंटेनर पलटी झाला. घरडा कंपनीच्या बसच्या मागे एक कार आणि त्या मागे एक ट्रक होता. बसच्या मागे असणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदल्या.

ST bus brakes fail at Anaskura Ghat Drivers saves 50 passengers lives
अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
kalyan Drunk and drive drunkard car driver
कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक, कार चालक अनिल तिवारी पोलिसांच्या ताब्यात
One person died, eight injured , vehicle fell in valley,
ठाणे : वाहन दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी
thane accident on old Kasara Ghat on Mumbai Nashik highway containers overturned
जुन्या कसारा घाटात अपघात, वाहनांच्या रांगा
Overhead wire breakage at Aadvali disrupted Konkan Railway
कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, आडवली येथे ओहरहेड वायर तुटली
three dead and three serious injured in horrific accident on Mumbai-Goa highway
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर तीनजण गंभीर जखमी
Maharashtra accident 11 deaths
तीन दुर्घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू, सोलापूर, जालन्यात मोटारींचे अपघात; चंद्रपुरात दुचाकीची ट्रकला धडक

हेही वाचा – “पंतप्रधानांसह ९ केंद्रीय मंत्री, १९ राज्याचे मुख्यमंत्री, लाडक्या बहि‍णींसह…”; शपथविधी सोहळ्याला कोण-कोण असणार? भाजपा नेत्याने सांगितली यादी

हेही वाचा – Sudhir Tambe : बाळासाहेब थोरातांबाबत सुधीर तांबेंचं मोठं विधान; म्हणाले, “भाजपात असते तर आज…”

घरडा कंपनीच्या गाडीत असणारे घरडाचे कर्मचारी या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. किमान पंधरा ते वीस कर्मचारी या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. खाजगी बस आणि कंटेनर यांच्यातील अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. चिपळूण पोलीस महामार्ग यांच्या प्रयत्नातून सुमारे दोन ते अडीच तासाने या मार्गावरची वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. परशुराम घाटात या ठिकाणी अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे.

Story img Loader