शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना सिटी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने मोठा झटका दिलाय. न्यायालयाने अडसूळ यांना ईडी कारवाईपासून दिलासा देण्यास नकार दिलाय. तसेच अटकपूर्व जामिनासाठी रीतसर विशेष न्यायालयात अर्ज करण्याची सूचना केलीय.

नेमकं प्रकरण काय?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि बडनेराचे आमदार रवि राणा यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. आमदार रवि राणा यांनी सिटी बँकेत ९८० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार केली. यानंतर ईडीने या दोघांना समन्स पाठवले होते. त्यानंतर ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहचले होते.

article about conspiracy to defame the judiciary constitution protection by judiciary
लेख : न्यायपालिकेच्या बदनामीचे षड्यंत्र!
gurmeet ram rahim
“राम रहीमला पॅरोल देण्यापूर्वी…”, उच्च न्यायालयाचा हरियाणा सरकारला दणका; म्हणाले, “तुम्ही अशा किती गुन्हेगारांना…”
Jaya Prada
अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांना फरार का घोषित करण्यात आलं? नेमकं हे प्रकरण काय?
allahbad highcourt on vyasji ka tehkhana
Gyanvapi Case : ‘व्यासजी का तहखाना’मधील पूजा थांबविण्याच्या मुलायम सरकारच्या आदेशाला न्यायालयाने बेकायदा का ठरवले?

ईडीने बजावलेल्या समन्सविरोधात माजी खासदार आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच कठोर कारवाईपासून तातडीचा दिलासा देण्याची मागणी केली. मात्र न्यायालयाने त्यांच्या याचिकेवरील सुनावणीत तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला होता. तसेच अडसूळ यांचे वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले होते. या सुनावणीत तर न्यायालयाने त्यांची याचिकाच फेटाळली.

अडसूळांची ईडी तक्रार रद्द करण्याची मागणी फेटाळली

ईडीने अडसूळ यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. तसेच त्यांचे कांदिवली येथील घर व कार्यालयाची झडतीही घेतली होती. यानंतर अडसूळ यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर अडसूळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेत कारवाईपासून संरक्षण देण्याची तसेच ईडीने नोंदवलेली तक्रार रद्द करण्याची मागणी केली आहे.

“बँकेतील खातेदारांचे पैसे अवैध पद्धतीने बांधकाम व्यावसायिकांना दिल्यानं बँक बुडाली”

दरम्यान, आमदार रवि राणा म्हणाले होते, “आनंदराव अडसूळ आणि त्यांच्या जावयाने सिटी कोऑपरेटिव बॅंकेला स्वतःच्या मालमत्ता भाड्याने दिल्या. त्या बँकेचे चेअरमन हे आनंदराव अडसूळ आहेत. बँकेतील खातेदारांचे पैसे अवैध पद्धतीने बांधकाम व्यावसायिकांना देण्यात आले. त्यामुळे ही बँक बुडाली. यामध्ये ९८० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल होऊन दोन वर्ष झाली मात्र मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे असल्यामुळे यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यानंतर मला आज माहिती मिळाली आहे की आनंदारव अडसूळ यांना अटक झाली आहे. हळूहळू तुमच्यावरही ही वेळ येणार आहे.”

“आनंदराव अडसूळ यांच्या घरी इडीचे अधिकारी आले असून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरु असेल. ईडीचे अधिकारी इतक्या सकाळी आल्यानंतर मला वाटले की त्यांना अटक झाली असेल. कारण गंभीर गुन्हा त्यांनी केला आहे. ईडीने कारवाई केली असेल तर खातेदारांना नक्की न्याय मिळेल,” अशी प्रतिक्रिया रवि राणा यांनी व्यक्त केली होती.

“ही रवि राणा यांनी पेरलले माहिती, इडीच्या अधिकाऱ्यांना पैसा किंवा राजकीय दबावाखाली ठेवलंय”

या आरोपांनंतर अभिजीत अडसूळ यांनी एबीपी माझाशी बोलताना रवि राणांवर सडकून टीका केली होती. ते म्हणाले होते, “ही रवि राणा यांनी पेरलले माहिती आहे. कुठल्याही प्रकारची अटक झालेली नाही. रवि राणा यांनी इडीच्या अधिकाऱ्यांना पैशाच्या किंवा राजकीय दबावाखाली ठेवलेलं आहे. पहिल्या वेळी चौकशीसाठी बोलवल्यानंतर आनंदराव अडसूळ यांनी जवाब नोंदवला होता कारण तक्रारदार ते स्वतः होते. या गैरव्यवहार प्रकरणी आनंद अडसूळ यांनी एन एम जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली होती.”

हेही वाचा : ‘ईडी’च्या कारवाईविरोधात अडसूळ उच्च न्यायालयात

“रवि राणा यांच्यावर खोट्या जातप्रमाणपत्र प्रकरणी हायकोर्टाने ताशेरे ओढले होते. सुप्रीम कोर्टात २९ सप्टेंबर रोजी याप्रकरणी अंतिम सुनावणी होणार असल्याने आज हे समन्स बजावण्यात आलं आहे. इडीच्या जाळ्यात अडकलेला एजाज लकडावाल्याचा कोटींच्या व्यवहाराच्या नोंदी या नवनीत राणा यांनी निवडणुकीवेळी जो अर्ज भरला होता त्यामध्ये लकडावाला कडून ८६ लाख घेतल्याची नोंद केली आहे,” असं अभिजीत अडसूळ यांनी म्हटलं होतं.

“८०० कोटींचा टर्नओवर असलेल्या बॅंकेत ९८० कोटींचा घोटाळा कसा?”

“८०० कोटींचा टर्नओवर असलेल्या बॅंकेत ९८० कोटींचा घोटाळा कसा झाला? बँकेतील अधिकाऱ्यांनी घोटाळा केल्याचे समजल्यानंतर मी स्वतः आर्थिक घोटाळे आणि बँकिंग फसवणुकीचा तपास करणाऱ्या संस्थेकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू आहे. यामध्ये आम्ही कोणीही सामील नाही,” असे आनंदराव अडसूळ यांनी म्हटलं होतं.