मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात, सहा वाहने एकमेकांवर आदळली; तीन ठार, सहा जखमी

आज पहाटे साडेपाचच्या सुमारास हा विचित्र अपघात मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर खोपोलीजवळच्या बोर घाटामध्ये झाला, ज्यात तिघांचा मृत्यू झालाय.

Accident Mumbai Pune Express Way
पहाटे साडपाचच्या सुमारास झाला अपघात

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर खोपोलीजवळ बोर घाटात एक भीषण अपघात झाला आहे. आज म्हणजेच १८ ऑक्टोबर २०२१ रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात तिघेजण ठार झाले तर सहा प्रवासी जखमी झाले आहेत.

मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर कोंबडी वाहून नेणाऱ्या टेम्पोने पुढच्या टेम्पोला धडक दिली. त्यानंतर एक दोन नाही तर तब्बल सहा वाहने एकमेकांवर आदळली यामध्ये दोन टेम्पो, दोन कार, खाजगी बस आणि ट्रेलर एकमेकांवर आदळले.

अपघातामुळे वाहतूक काही काळ विस्कळित झालेली वाहतूक आता सुरळीत आहे. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai pune express way 6 vehicles accident 3 dead 6 injured scsg

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या