Mumbai Pune Expressway Accident Traffic Updates: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग म्हणजे या दोन्ही शहरांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. साधारणपणे ३ तासांत एका शहरातून दुसऱ्या शहरात पोहोचण्यासाठी या मार्गाचा दोन्ही शहरातल्या नागरिकांना मोठा फायदा होतो. पुणेकर असोत किंवा मुंबईकर, बाय रोड म्हटलं की मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पहिली पसंती असते. पण आज सकाळपासून या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. थोड्या-थोडक्या नाही तर चक्क २० ते २५ किलोमीटरच्या! तेलाचा टँकर रस्त्यातच कलंडल्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग ठप्प झाला असून पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Gas Tanker Overturns Mumbai Pune Expressway Traffic Live Updates: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतुकीचा प्रचंड खोळंबा, दिवसभर वाहतूक ठप्प राहणार!
Mumbai Pune Expressway Traffic Update: मुंबई-पुणे एक्सप्रेस कोंडीचा एसटीला फटका, स्वारगेटला निघालेली बस पनवेलहून पुन्हा ठाण्यात परतली
Mumbai Pune Expressway Traffic Update : गॅस गळती रोखण्यात अखेर यश, मुंबई वाहिनीवरून दोन्ही दिशेची वाहतूक संथगतीने सुरू
PHOTOS: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक ठप्प; गॅस गळती वाढली; पर्यायी मार्ग जाहीर...वाचा सविस्तर
वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी अजून पुढील सहा-सात तास लागणार
'आयआरबी' फक्त टोलवसुली करते. अधिकारी काम करत नाहीत. त्यामुळे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी होतेय. वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी अजून पुढील सहा-सात तास लागू शकतात, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
Mumbai Pune Expressway Traffic Updates: खालापूर टोलनाक्यापासून वाहतुकीची मोठी कोंडी
वाहतूक कोंडीची पूर्वसूचना न मिळाल्याने प्रवाशांचा टोलवर प्रवाशांनी संताप व्यक्त केला. काल (मंगळवार) उलटलेला टँकर काढण्यास प्रशासनाला अजूनही यश आले नाही. बुधवारी (४ फेब्रुवारी) सायंकाळपर्यंत वाहतूक कोंडी राहण्याची शक्यता वर्तवली आहे. एक्सप्रेस वे वर खालापूर टोलनाक्यापासून वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे.
Mumbai pune expressway news: २१ तासांपासून पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर वाहतुकीची कोंडी
टोलवसुली करणारे आयआरबीचे अधिकारी कुठे आहेत? असा प्रश्न प्रवाशी करत आहेत. गेल्या २१ तासांपासून पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर वाहतुकीची कोंडी आहे.
पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग
१) ताम्हिणी घाट मार्ग:
पुणे → पौड → ताम्हिणी घाट → माणगाव → मुंबई शहर
हा मार्ग दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक उपयुक्त आहे. काही ठिकाणी रस्ते अरुंद असल्याने काळजीपूर्वक वाहन चालवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
२) माळशेज घाट मार्ग:
पुणे → चाकण → नारायणगाव → माळशेज घाट → कल्याण / ठाणे शहर
हा मार्ग मुंबई उपनगर, ठाणे व नवी मुंबईकडे जाणाऱ्यांसाठी योग्य आहे. सकाळी आणि सायंकाळी घाटात काही प्रमाणात धुके असू शकतात. तसेच वळणदार रस्ते असल्याने वेग मर्यादेत ठेवावा.
लोणावळा–खंडाळा मार्ग सध्या पूर्णपणे टाळावा.
वाहतूक कोंडीमुळे प्रवासाचा वेळ साधारण ३ ते ५ तासांनी वाढण्याची शक्यता आहे.
प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना:
पुरेसे इंधन, पिण्याचे पाणी व हलके अन्न सोबत ठेवा.
शक्य असल्यास रात्रीचा प्रवास टाळावा.
वाहतूक पोलिसांच्या सूचना व अपडेट्सवर लक्ष ठेवा.
आपत्कालीन परिस्थितीसाठी वाहनाची प्राथमिक तपासणी करूनच निघावे.
Mumbai pune expressway tanker accident: लोणावळा आणि खोपोली शहरांजवळ वाहतूक मंदावली
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक कोंडीमुळे लोणावळा आणि खोपोली शहरांजवळ वाहतूक मंद गतीने पुढे सरकत आहे.
Mumbai Pune Expressway Traffic : टोल घेता मग सुविधा का देत नाही?
पुणे- मुंबई वाहतूक कोंडीत अडकल्याने एक प्रवासी म्हणाला की सरकार गतीमान प्रवासासाठी टोल घेते मग तशी व्यवस्था का उपलब्ध करून देत नाही. मागील कित्येक तासांपासून कोंडीत अडकलो आहे. आता प्रशासन टोल माफ करणार का? या मार्गावर तर नेहमीच वाहतुकीची कोंडी होती. त्यावर पर्यायी व्यवस्था का केली जात नाही
Accident on mumbai pune expressway: पिण्यासाठी पाणीही मिळेना, प्रवाशांकडून रोष व्यक्त
संबंधित प्रशासन आणि यंत्रणा झोपली आहे का? महामार्गावर झालेल्या कोंडीत अनेक रुग्ण, शासकीय कामांसाठी जाणारे अधिकारी, सामान्य नागरिक अडकले आहेत. त्यांनी काय करायचं? इथं खाण्यासाठी काहीही नाही तसेच पिण्यासाठी पाणीही नाही. कोंडीत अडकल्याने लहान मुलांचीही मोठी गैरसोय झाली आहे, असंही एका प्रवाशाने सांगितले.
Mumbai Pune expressway news: बोरघाट परिसरात अतिशय संथगतीने वाहतूक सुरू
टँकरमध्ये अतिशय ज्वलनशील प्रोपलीन गॅस असल्याने, महामार्ग प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक रोखून धरली होती. त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. हजारो प्रवाशी अडकून पडले होते. रात्री बारानंतर पुणे मार्गिकेवरील एका लेनवर मुंबईकडे येणारी वाहतूक वळवण्यात आली. त्यामुळे अडकून पडलेल्या प्रवाशांची आणि वाहन चालकांची सुटका झाली. सध्या बोरघाट परिसरात अतिशय संथगतीने सध्या वाहतूक सुरू आहे
Gas tanker overturns on Mumbai-Pune Expressway: मंद गतीने वाहतूक सुरू
पुण्याच्या दिशेने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू, मंद गतीने वाहतूक सुरू आहे. अपघाताला १९ तास झाले असून अजूनही महामार्ग पूर्णपणे सुरू करण्यात आला नाही.
Mumbai pune expressway news: पुणे-मुुंबई एक्सप्रेस वे वरील अपघातामुळे रुग्णालयात पोहचायला उशीर
एक प्रवासी म्हणाला, मी लातूरहून आला आहे. माझ्या मित्राला कॅन्सरच्या उपचारासाठी मुंबईत रुग्णालयात न्यायचं आहे. आज सकाळी आठ वाजता आम्हाला रुग्णालयात पोहचायचं होतं पण मोठ्या वाहतूक कोंडीमुळे मी पोहचू शकलो नाही. पहाटे चार वाजल्यापासून इथे कोंडीत अडकलो आहे. उशीर झाल्याने मित्राच्या उपचारावर परिणाम होणार आहे.
Accident on mumbai pune expressway today: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातामुळे ठिकठिकाणी ब्लॉक
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील झालेल्या अपघातातील वाहन हटवण्याचे काम सुरू आहे. या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. वाहतूक सुरळीत करण्याचे सुरू आहे. महामार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे अशी माहिती, खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी ही माहिती दिली.
Gas tanker mumbai pune expressway: पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
पर्यायी मार्ग कोणते?
खोपोलीजवळ झालेल्या अपघातामुळे द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली आहे. गुगल मॅपवर या मार्गावर पूर्णपणे ब्लॉक दाखवण्यात येत आहे. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाट टप्प्यात, किलोमीटर ४१ (मुंबई लेन) येथे गॅस टँकर उलटल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. त्यामुळे आज मुंबई–पुणे तसेच पुणे–मुंबई या दोन्ही दिशांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.
पर्यायी मार्ग:
१) चांदणी चौक – ताम्हिणी घाट – रायगड मार्गे मुंबई (पुणे-पिरंगुट-पौड-मुळशी-ताम्हिणी घाट- वरचीवाडी-साजे-नांदगाव-पाली-पेडली-दुरशेत-उंबारेनंतर पुढे पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग)
२) आळे फाटा – माळशेज घाट – ठाणे मार्गे मुंबई

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर अपघात, वाहतूक ठप्प (फोटो - लोकसत्ता)
Gas Tanker Overturns Mumbai Pune Expressway Traffic Live Updates: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतुकीचा प्रचंड खोळंबा

