अलिबाग नगर परिषदेत १७ जागांपकी ९ जागा महिलांसाठी आरक्षित

अलिबाग नगर परिषदेच्या १७ जागांपकी ९ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत.

अलिबाग नगर परिषदेच्या १७ जागांपकी ९ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. शनिवार नगरपालिकेच्या सभागृहात प्रभाग रचना व आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. अलिबागचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव सोनवणे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते. नेहा जाधव या मुलीने आरक्षणाच्या चिठ्ठय़ा उचलल्या.

अलिबाग नगर परिषदेत ८ प्रभाग असून त्यात १७ वार्ड आहेत. त्याचे आज आरक्षण जाहीर करण्यात आले. प्रभाग १मध्ये १ – अ  अनुसूचित जमाती महिला, १- ब. सर्वसाधारण. प्रभाग २ मध्ये २- अ  ना.म. प्रवर्ग महिला, २- ब सर्वसाधारण, प्रभाग तीनमध्ये ३ – अ. जागेत ना. म.प्र. सर्वसाधारण, ३-ब. सर्वसाधारण महिला, प्रभाग ४ मध्ये  ४- अ ना. म. प्र.  सर्वसाधारण, ४ – ब. सर्वसाधारण महिला, प्रभाग ५मध्ये ५- अ. ना.म.प्र. सर्वसाधारण, ५- ब. सर्वसाधारण महिला,  प्रभाग ५मध्ये ५- अ. अनुसूचित जाती सर्वसाधारण, ५-  ब. जागेत सर्वसाधारण महिला, प्रभाग ६मध्ये ६- अ.  ना. म. प्र. महिला, ६- ब. सर्वसाधारण,  प्रभाग ७ मध्ये ७- अ. सर्वसाधारण महिला, ७-  ब सर्वसाधारण,  प्रभाग ८मध्ये ८- अ अनुसूचित जमाती सर्वसाधारण, ८- ब  ना.म.प्र. महिला, ८- क जागेत सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले आहे. आरक्षण सोडतीच्या वेळी अलिबाग नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्षा सुरक्षा शाह यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Municipal council election in alibag