मतदार याद्यांचा निरंतर पुनरीक्षण कार्यक्रम

मतदार याद्या अद्यावत करण्याबाबतची कार्यवाही अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

सावंतवाडी : भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे निर्देशानुसार दिनांक १ जानेवारी २०१६ या अर्हता दिनांकावर आधारिता सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील २६८-कणकवली, २६९-कुडाळ व २७० सावंतवाडी या विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दिनांक ८ ऑक्टोबर २०१५ ते दिनांक ७ नोव्हेंबर २०१५ पर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी/साहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी निकालात काढून, स्वीकृत समाविष्ट अर्जाची नोंद तसेच मयत, स्थलांतरित व दुबार मतदार नोंदीची वगळणी प्रत्येक मतदार संघाच्या ठिकाणी ईआरएमएस या संगणक प्रणालीमध्ये ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली आहे. नवीन मतदारांची नोंदणी व मयत, स्थलांतरित व दुबार मतदारांची वगळणी करून तयार करण्यात आलेली छायाचित्र मतदार यादी पुरवणी क्रमांक १, मूळ मतदार यादीसह अंतिम मतदार यादी म्हणून दिनांक १६ जानेवारी २०१६ रोजी जिल्ह्य़ातील सर्व मतदार केंद्राच्या ठिकाणी, तहसीलदार कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये व जिल्हाधिकारी कार्यालय (निवडणूक शाखा) सिंधुदुर्ग तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

मतदार याद्या अद्यावत करण्याबाबतची कार्यवाही अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरदेखील निरंतर प्रक्रियेमध्ये तसेच राष्ट्रीय मतदार याद्यांच्या शुद्धीकरण कार्यक्रमामध्ये चालू ठेवण्यात आलेली आहे. त्याबाबतची कार्यवाही मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांच्यामार्फत चालू राहणार आहे. माहे नोव्हेंबर २०१६ ते जानेवारी २०१७ मध्ये होणाऱ्या नगर परिषद/ नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिनांक १० सप्टेंबर २०१६ हा दिनांक मतदार यादी करीता अधिसूचित केलेला आहे. त्यानुसार विधानसभेची दिनांक १ जानेवारी २०१६ या अर्हता दिनांकावर प्रसिद्ध केलेली मतदार यादी तसेच त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या दिनांकापर्यंत प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीच्या पुरवण्या आणि निरंतर प्रक्रियेमध्ये अंतिम झालेल्या मतदारांची नावे विचारात घेण्यात येणार आहे.

मतदार यादीमध्ये ज्यांची दुबार नावे नोंदविली असल्यास, तसेच आपल्या कुटुंबातील मतदार यादीमध्ये नाव असलेले सदस्य मयत असल्यास तसेच एखादा सदस्य अन्य मतदार संघामध्ये स्थलांतरीत असल्यास, त्यांची नावे मतदार यादीतून कमी करण्याबाबत नमुना-७ भरून संबंधित मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किंवा साहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांचे दिनांक ३१ ऑगस्ट २०१६ पूर्वी अर्ज यांचे कार्यालयाकडे देण्यात यावेत. तसेच नवीन नाव दाखल करताना पूर्वीच एखाद्या मतदार संघामध्ये नाव दाखल असल्यास त्याचा तपशिल नमुना-६ भाग क्रमांक ४ मध्ये नमूद करून किंवा नव्याने मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्याकरीता नमुना-६ अर्जासोबत सर्वसाधारण वास्तव्याचा पुरावा तसेच जन्म नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयाकडे सादर करावेत. त्याचप्रमाणे ज्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीमध्ये समाविष्ट नाही, त्यांनी त्यांचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र संबंधित मतदार नोंदणी अधिकारी/ साहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे अथवा आपल्या गावातील अथवा मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावेत, असे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग हे कळवितात.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Municipal council election in sawantwadi