scorecardresearch

बोलण्यास टाळाटाळ केल्याने केला १८ वर्षीय तरुणीचा खून ; चाकण पोलिसांनी केली अटक

औद्योगिक वसाहत असलेल्या चाकणमध्ये एका तरुणाने १८ वर्षीय तरुणीचा गळा दाबून खून केला आहे.

arrest
( संग्रहित छायचित्र )

औद्योगिक वसाहत असलेल्या चाकणमध्ये एका तरुणाने १८ वर्षीय तरुणीचा गळा दाबून खून केला आहे. या प्रकरणी आरोपी तरुणाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. प्रीती सहा अस खून झालेल्या तरुणीच नाव असून विष्णुकुमार सहा अस आरोपीच नाव आहे. आरोपी आणि तरुणी एकमेकांना ओळख होते.

त्यांच्यात बोलणं व्हायचं. पण, प्रीती च्या आई चे आणि विष्णुकुमार चे वाद झाले होते. प्रीती ची आई विष्णुकुमार ला बोलत नव्हती तसेच प्रीती देखील बोलण्यास टाळाटाळ करत होती. याच रागातून त्याने आज सकाळी प्रीती चा गळा दाबून खून केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विष्णुकुमार सहा आणि प्रीती ची आई हे एकाच कंपनीत काम करतात. त्यांच्यात काही कारणावरून वाद झाले, यामुळं प्रीती ची आई विष्णुकुमार ला बोलत नव्हती. विष्णुकुमार हा प्रीती च्या घरी यायचा. त्यांच्यात बोलणं व्हायचं. परंतु, आई बोलत नसल्याने प्रीती ने देखील विष्णुकुमार ला बोलण्यास टाळाटाळ करत होती. आधीच तिची आई बोलत नसल्याने रागात असलेल्या विष्णुकुमार ने आज सकाळी प्रीती घरात एकटीच असताना तिचा गळा दाबून खून केला. ही बाब शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला समजली. त्यांनी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. विष्णुकुमार त्याच्या खोलीत जाऊन बसला होता. त्याला तिथून चाकण पोलिसांनी अटक केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Murder girl for refusing speak industrial estate chakan police made the arrest amy

ताज्या बातम्या