नागपूरमध्ये पती दारू पिऊन सतत मारहाण करता म्हणून पीडित पत्नीने पतीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे आरोपी पत्नीने दारूच्या नशेत असलेल्या नवऱ्याने स्वतःचे डोके शिलाई मशीनवर आपटून आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालात पत्नीचा बनाव उघड झाला. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वाजपेयी नगरमध्ये ही घटना घडली.

आरोपी महिलेचा नवरा रोज रात्री दारू पिऊन येत होता आणि घरात गोंधळ घालत होता. याला वैतागलेल्या बायकोने नवऱ्याच्या आत्महत्येचा बनाव रचला. मात्र, शव विच्छेदन अहवालात डोक्याला मार आणि गळा आवळ्याच्या खुणा आढळल्याने पत्नीचा बनाव फसला, मृताचे नाव ग्याणी यादव असे आहे. आरोपीचे त्याच्याशी १८ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, कुठलाही कामधंदा न करता पती दारू पिऊन घरी गोंधळ घालत होता.

What Bacchu Kadu Said?
अमरावतीतल्या मैदान राड्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला अटक व्हावी म्हणून राणा दाम्पत्याने…”
young man committed suicide as he did not want to marry
खळबळजनक! लग्न करायचं नसल्याने नवरदेवाने केली आत्महत्या; आत्महत्येपूर्वी मामाला…
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

आधी गळा आवळला, नंतर डोक्यात रॉडने वार करून हत्या

अखेर पतीच्या अशा वागण्याचा मुलांवर देखील परिणाम होत असल्याने संतापलेल्या पत्नीने त्याची गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यानंतर आरोपी पत्नीने रॉडने डोक्यावर मारून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर नवऱ्याने शिलाई मशीनवर डोकं आपटून आत्महत्या केल्याची माहिती परिसरात दिली.

हेही वाचा : व्यसन करू नकोस म्हटल्याने राग अनावर, नऊ जणांनी केला तरुणाचा खून

सुरुवातीला पोलिसांनी देखील याची नोंद घेतली. मात्र, शव विच्छेदन अहवालात सत्य समोर आले. यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नी राणीला ताब्यात घेतले. कलमना पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत, अशी माहिती कळमना पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिली. शिलाई काम करून घर चालवणाऱ्या पत्नीने पतीच्या जाचाविरोधात रितसर पोलीस तक्रार देण्याऐवजी हत्येचा चुकीचा मार्ग निवडला. मात्र, त्यामुळे त्रासातून सुटका होण्याऐवजी तिलाच अटक झाली आहे. त्यामुळे तिच्या मुलांवरही हालाखीचे दिवस आले आहेत.