scorecardresearch

मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून खून ; तीन तासांत आरोपीस अटक

शुक्रवारी दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोघांनाही पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठविले.

(प्रातिनिधीक छायाचित्र)

नांदेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून एकाचा खून करण्यात आला होता. ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींना केवळ तीन तासांत अटक केली. शुक्रवारी दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोघांनाही पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठविले.

मागील दोन वर्षी करोना संकटामुळे डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करता आली नाही. यंदा करोनाचे सर्व निर्बंध शिथिल झाल्याने डॉ. आंबेडकर जयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. बळीरामपूर येथील जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीचा समारोप नाईक महाविद्यालय येथे होणार होता. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे रात्री ९ वाजता ही मिरवणूक नाईक कॉलेज येथे पोहोचली. यावेळी किशोर ठाकूर व त्याचा मित्र आदिल शेख याने सचिन थोरात याच्याशी वाद घातला. या वादानंतर सचिनने त्या दोघांनाही मिरवणुकीतून बाहेर जाण्यास बजावले. त्यामुळे चिडलेल्या किशोर ठाकूर याने कमरेला असलेला चाकू काढून सचिन थोरात याच्यावर सपासप वार केले.

 या हल्ल्यात सचिनचा मृत्यू झाला.  तर सुमेध वाघमारे जखमी झाला. हल्ल्यानंतर किशोर ठाकूर आणि शेख आदिल दोघांनीही घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीणचे ठाणेदार अशोक घोरबांड आणि गुन्हे शोध पथक प्रमुख संकेत दिघे हे टीमसह घटनास्थळावर दाखल झाले. घोरबांड यांनी दिघे यांना काही सूचना देत आरोपींच्या अटकेसाठी पाठविले. रात्री १२ वाजताच्या नंतर दिघे यांनी दोन्ही आरोपींना अटक केली. शुक्रवारी सकाळी दोघांनाही न्यायालयात उभे केले असता त्यांना पाच दिवसाची कोठडी सुनावण्यात आली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Murder over dispute in dance in ambedkar jayanti procession in nanded zws

ताज्या बातम्या