MVA Jode Maro Andolan : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या घटनेने महाराष्ट्र हळहळला. २६ ऑगस्टला ही घटना घडली. ज्यानंतर सरकावर आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. आता याच घटनेचा निषेध म्हणून मुंबईत जोडे मारो आंदोलन करण्यात येतं आहे. महाविकास आघाडी या प्रकरणी आक्रमक झाली आहे. तुरुंगात टाकलं तरीही चालेल पण आंदोलन होणारच असा पवित्रा महाविकास आघाडीने घेतला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर ( MVA Jode Maro Andolan ) उतरले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान… त्यांचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही, असं म्हणत महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरलं आहेत. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष केला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असं म्हणत शेकडो कार्यकर्ते गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाले. तसंच गद्दारांना माफी नाही, शिवद्रोहींना माफी नाही अशा घोषणाही ( MVA Jode Maro Andolan ) यावेळी देण्यात आल्या.
आधी परवानगी नाकारली, नंतर बॅरिगेट्स हटवले
मविआच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मात्र आज रविवारचा दिवस आहे. या भागातील कार्यालयांना सुट्टी आहे. असं असताना आमच्या आंदोलनाला परवानगी का नाही? असा सवाल महाविकास आघाडीने केला. त्यानंतर हा मोर्चा अडवला जाणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. लावलेले बॅरिगेटही हटवण्यात आले आहेत. हा मोर्चा आता गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाला. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या मोर्चात ( MVA Jode Maro Andolan ) सहभागी झाले आहेत.
हे पण वाचा- Sanjay Raut : “अटक केली तरी चालेल, पण…”, मविआच्या आंदोलनाला परवानगी नाकारल्याने संजय राऊतांचा सरकारला इशारा
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
MVA Jode Maro Andolan उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवाजी महाराजांचा पुतळा हवेतून कसा पडला? राज्यात भ्रष्टाचारात गुंतलेले सरकार सुरू आहे. स्मारकाच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. पुनर्बांधणीच्या नावाखाली करोडोंचा भ्रष्टाचार होणार आहे. मी त्यांना शिवाचा गद्दार म्हणेन. शरद पवार म्हणाले की, पुतळ्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्य सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. ही बाब गंभीर आहे.
नाना पटोले काय म्हणाले?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सिंधुदुर्गात पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी स्वत: पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री आले होते. मूर्ती बनवण्याचा नियम आहे, परवानगी घ्यावी लागते. हे शिवविरोधी लोक आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांचे कारण आणि डीजी पदावर महिला अधिकाऱ्याची नियुक्ती का करण्यात आली आहे. डीजी रश्मी शुक्ला भाजप आणि आरएसएसचा अजेंडा चालवत आहेत.