MVA Jode Maro Andolan Uddhav Thackeray Speech : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीने आज (रविवार, १ सप्टेंबर) जोडे मारो आंदोलन पुकारले आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोलेंसह मविआचे अनेक नेते येथे उपस्थित होते. यावेळी झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर ताशेरे ओढले. चुकीला माफी नाही असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली.

“माझ्यासाठी तसेच माझ्या सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नसून ते आमचे आराध्यदैवत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गमध्ये जे घडले त्याबद्दल मी शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊ माफी मागतो”, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घडलेल्या प्रकाराबाबत पालघऱ येथील कार्यक्रमात शुक्रवारी माफी मागितली होती. यावरूनच उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीकास्र डागलं.

bjp vs congress in haryana election
विश्लेषण : हरियाणात किसान, जवान, पहिलवान नाराज? मतदारांचा कौल कुणाला? भाजप सावध, काँग्रेस आशावादी…
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
BJP Chintu Verma
Garba Pandal: ‘गरब्यात प्रवेश करण्यासाठी गोमूत्र प्राशन करायला द्या, जेणेकरून…’, भाजपा नेत्याचे अजब तर्कट
Prime Minister Narendra Modi belief about Make in India
भारताला कोणीच रोखू शकत नाही! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास; ‘मेक इन इंडिया’ची दशकपूर्ती
Dharavi News in Marathi
Dharavi Masjid : धारावीत मशिदीचा बेकायदेशीर भाग तोडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या गाडीची तोडफोड, शेकडो मुस्लिमांचा जमाव एकवटला
Who is BJP face for Delhi poll campaign Smriti Irani
Smriti Irani for Delhi CM: अमेठीत पराभव आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य दावेदार, भाजपा दिल्लीची सूत्रे स्मृती इराणींच्या हाती देणार?
vladimir putin offers immediate ceasefire if ukraine abandons nato plans
Vladimir Putin on Birth Rate: ‘ऑफिस ब्रेकदरम्यान सेक्स करा’, रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचे जन्मदर वाढवण्यासाठी फर्मान
China Sex Camp for wives
पतीनं बाहेर संबंध ठेवू नये म्हणून पत्नींसाठी चीनमध्ये खास शिबिराचं आयोजन, सोशल मीडियावर लोक म्हणाले…

हेही वाचा >> MVA Jode Maro Andolan : छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मविआचं जोडे मारो आंदोलन, ठाकरे-पवारांसह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर

“सत्ताधारी आमच्यावर टीका करत आहेत की आम्ही राजकारण करत आहोत. पण ते राजकारण करत नसून गजकर्ण आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे नेहमी म्हणायचे की हल्ली राजकारण म्हणजे गजकर्ण झालंय. खाजवत बसत आहेत. पण या चुकीला माफी नाही. आणि मुद्दाम हून मनातील संताप व्यक्त करण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया म्हणजे देशाचं प्रवेशद्वार येथे जमलो आहे. हे शिवद्रोही सरकारला बेकायदा सरकारला गेट आऊट ऑफ इंडिया (Get out of India) करण्यासाठी आम्ही इथे जमलो आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हीच मोदी गॅरंटी

“देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात आले आणि माफी मागितली. माफी मागितली नसती तर महाराष्ट्राने शिल्लक ठेवले असता. पण माफी मागतानासुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. मग्रुरीने माफी आम्हाला मान्य नाही. व्यासपीठावर एक शाहाणा, दोन दीड शहाणे म्हणजे एक फुल – दोन हाफ बसले होते. त्यातील एक हाफ हसत होता. महाराजांची तुम्ही एवढी थट्टा करता. तुम्हाला काय वाटतं? मोदींनी माफी कशासाठी मागितली? महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली? पुतळा बसवताना भ्रष्टाचारा झाला म्हणून मागितली? भ्रष्टाचाऱ्यांवर पांघरून घालण्याकरता मागितली? निवडणुकीसाठी तुम्ही सिंधुदुर्गात आला होता. आम्हाला अभिमान वाटला होता की नौदल दिन माझ्या महाराष्ट्रातील किनारपट्टीवर साजरा होत आहे. हा कार्यक्रम दिमाखदार केला होता. पण त्याच वेळेला घाईघाईने भ्रष्ट्राचार करून पुतळा बसवण्याची गरज नव्हती. निवडणुकीच्या वेळी मोदी म्हणत होते की मोदी गॅरंटी. हीच ती मोदी गॅरंटी, हात लावीन तिथे माती होईल”, असं म्हणत त्यांनी टीकाही केली.