MVA : महाविकास आघाडीची ( MVA ) सभा मुंबईतल्या बीकेसी या ठिकाणी पार पडली. या सभेत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, उद्धव ठाकरे, शरद पवार या प्रमुख नेत्यांसह नाना पटोलेंनीही भाषण केलं. प्रचाराच्या दृष्टीने महाविकास आघाडी तसंच इंडिया आघाडीची ही पहिलीच सभा होती. या सभेतून महाविकास आघाडीने महाराष्ट्राला पाच प्रमुख आश्वासनं दिली गेली आहेत. महिलांसाठी महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. पहिली योजना ( MVA ) राहुल गांधी यांनी जाहीर केली. त्यानंतर इतर चार घोषणा या शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगेंनी जाहीर केल्या.

राहुल गांधी काय म्हणाले?

“प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये खटाखट जमा होणार आहेत. महाराष्ट्रातील महिलांना बस सेवा मोफत दिला जाईल, एक रुपया घेतला जाणार नाही. भाजपा सरकारने महागाई वाढवली आहे. बेरोजगारी वाढवली आहे. त्यामुळे आमची पहिली गॅरंटी म्हणजे महिलांना तीन हजार रुपये आणि मोफत बससेवा सुरु करणार आहोत असं राहुल गांधी म्हणाले.

Sharad Pawar
Sharad Pawar : “राज्यात ‘मविआ’चं सरकार आल्यास ३ लाखांपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार”, शरद पवारांचं मोठं आश्वासन
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Uddhav Thackeray News Update News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना म्हणाले, “अहो देवाभाऊ, जाऊ तिथे खाऊ, मुंब्र्याच्या वेशीवर..”
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : “महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर महिलांना प्रति महिना ३ हजार रुपये आणि बस प्रवास मोफत”, राहुल गांधींची गॅरंटी
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Dhananjay Munde On Parli Assembly Constituency
Dhananjay Munde : “माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना…”; धनंजय मुंडेंच्या विधानाचा रोख कुणाकडे?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

महाविकास आघाडीच्या पाच प्रमुख घोषणा काय?

१) महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३००० रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास लागू करणार

२) शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देणार

३) जातनिहाय जनगणना करणार, ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करणार.

४) २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे दिली जाणार.

५) बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४००० रुपयांपर्यंत मदत दिली जाणार.

हे पण वाचा- उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना म्हणाले, “अहो देवाभाऊ, मुंब्र्याच्या वेशीवर..”

महाविकास आघाडीने ( MVA ) या प्रमुख घोषणा बीकेसी या ठिकाणी जाहीर केल्या आहेत. महाविकास आघाडीची ( MVA ) पहिलीच प्रचारसभा मुंबईत पार पडली. या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी भाषण केलं. तसंच शरद पवार, उद्धव ठाकरे यांचीही भाषणं झाली. त्यांनी या घोषणा जाहीर केल्या आहेत. आपलं सरकार आल्यानंतर या घोषणांची अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन मविआच्या ( MVA ) तिन्ही नेत्यांनी दिलं आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने या घोषणा करण्यात आल्या आहेत.

लाडकी बहीण योजनेला महालक्ष्मी योजनेने उत्तर

महायुतीने जी लाडकी बहीण योजना आणली आहे, त्या योजनेला उत्तर म्हणून महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजना आणली आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा तीन हजार रुपये देऊ असं महाविकास आघाडीने आश्वासन दिलं आहे. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे हे १५०० ऐवजी २१०० केली जातील अशी घोषणा केली होती. आता काँग्रेसने महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत ३ हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे.

Story img Loader