“माझी दृष्टी तपासायला माझं नेतृत्व समर्थ आहे ; संजय राऊत सारख्या माणसाने…” ; चंद्रकांत पाटील यांचा पलटवार

“महाराष्ट्र नीट चालला आहे की नाही हे तपासण्यासाठी…” असंही चंद्रकांत पाटील यांनी सूचवलं आहे

(संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र)

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील शाब्दिक युद्ध सुरूच आहे. कारण, एकाने टीका केली की दुसऱ्याकडून त्यावर प्रतित्त्युर दिलं जात आहे. चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील एकूण परिस्थितीवरून महाविकासआघाडी सरकारवर टीका केल्यानंतर संजय राऊत यांनी त्यावरून चंद्रकांत पाटील व भाजपावर निशाणा साधला होता. आता संजय राऊत यांच्या त्या विधानानंतर आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्त्युतर दिलं आहे.

“भाजपाच्या आयुष्यात टीक करण्याशिवाय दुसरं आहे तरी काय? भाजापाने चीनने केलेल्या घुसखोरीबाबत बोललं पाहिजे. सीमेवर फार गंभीर परिस्थिती आहे. या संपूर्ण देशात कुठलं राज्य व्यवस्थित असेल तर महाराष्ट्रच आहे. चंद्रकांत पाटील किंवा भाजपाच्या अन्य नेत्यांच्या चष्म्याचा नंबर मला चेक करावा लागेल.” असं संजय राऊत माध्यमांशी बोलाताना म्हणले होते.

“शिवसेनेला हे कळत नाही की त्यांना पूर्णपणे संपवण्याचा एक ‘प्लॅन’ सुरू आहे”

यावर प्रत्युत्तर देताना आज चंद्रकांत पाटील म्हणाले की, “माझी दृष्टी तपासून घ्यायला, माझं नेतृत्व समर्थ आहे. मी ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून प्रेरणा घेऊन सामाजिक, राजकीय काम करतो त्या संघाकडे तर ती उत्तम व्यवस्था आहे, आमचा कान पकडण्याची आम्हाला दुरूस्त करण्याची, संजय राऊत सारख्या माणसाने काल-परवा नशीबाने जे प्रकाशझोतात आलेले आहेत, त्यांच्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार आलं असा त्यांचा दावा आहे. त्यांनी माझी काही काळजी करू नये. महाराष्ट्र नीट चालला आहे की नाही, हे पाहण्यासाठी विविध जिल्ह्यांमधील दहा हजार लोकाचा प्रामाणिक सर्वे घ्या मग ते सांगतील की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदाही मंत्रालयात आलेले नाहीत, राज्याचे मुख्यमंत्री मागील जवळपास ७० दिवसांपासून कोणालाही उपलब्ध नाहीत. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात जवळपास ७० पेक्षा अधिक जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. राज्यात विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटत आहेत. त्यातून नैराश्य येऊन तरूण मुलांच्या आत्महत्या सुरू आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही, प्रोत्साहन अनुदान, नुकसान भरपाई, विमा अनुदान मिळालेलं नाही म्हणजे महाराष्ट्र चांगला चालला आहे, असं जर असेल तर ठीक आहे.”

“चंद्रकांत पाटलांनी उगाच इकडे तिकडे न तडमडता…”, संजय राऊतांचा सल्ला, म्हणाले “ते फारच सज्जन, निरागस, निष्पाप”

तर, “महाराष्ट्रातील राज्य उत्तम प्रकारे चाललेलं आहे. काल मुंबै बँकेच्या अध्यक्षपद देखील महाविकास आघाडीकडेच आलेलं आहे. हळूहळू या सगळ्या संस्था, संघटना यावर महाविकास आघाडीचा ताबा राहील. चंद्रकांत पाटील जे प्रदेशाध्यक्ष आहेत, जसं की मी मागेही म्हटलेलं आहे फार सज्जन गृहस्थ आहे, निरागस आहे, निष्पाप आहे, निष्कपट आहे. त्यांनी त्यांच्या पुढील निवडणुकीची तयारी करावी, तीन वर्षानंतर येणाऱ्या. आता इकडेतिकडे कडमडू नये त्यांनी त्यांच्या प्रतिमेला जपावं.” असंही संजय राऊत चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: My leadership is able to check my vision chandrakant patils reply to sanjay raut msr

Next Story
“हाच रुबाब भेंडी बाजार, भायखळ्यातल्या अमराठी पाट्यांना दाखवा”; भाजपाचे संजय राऊतांना आव्हान
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी