बीडमध्ये आज नगर-आष्टी रेल्वेमार्गाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपा नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होत्या. या रेल्वेमार्गाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाते, असे पंकजा मुंडे भाषणादरम्यान म्हणाल्या आहेत. बीड लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले होते. हे आश्वासन आज पूर्ण झाल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. या रेल्वेमार्गाला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याची मागणी करणार नाही, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

नगर-बीड-परळी रेल्वे आजपासून आष्टीपर्यंत धावणार; धनंजय मुंडेनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले…

हा मार्ग रेल्वे विभागासाठी फायद्याचा नाही. मात्र, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठिंब्यामुळे हा रेल्वेमार्ग जनतेच्या सेवेसाठी तयार करण्यात आल्याचे मुंडे यावेळी म्हणाल्या आहेत. बीडच्या स्वाभिमानी माणसासाठी हा रेल्वेमार्ग भेट आहे. हा रेल्वेमार्ग मुंबई ते परळीपर्यंत व्हावा, अशी अपेक्षा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली होती.

“पंतप्रधानजी देशाला हे जाणून घ्यायचं आहे की…”, नरेंद्र मोदींचा ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत काँग्रेसचा हल्लाबोल

नगर-आष्टी हा ६६ किलोमीटरचा रेल्वेमार्ग आहे. या मार्गामुळे मराठवाड्यातील जनतेचा प्रवास सुकर होण्यास मदत होणार आहे. या मार्गाचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज पार पडला. या मार्गाबाबत ट्वीट करत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘माझ्यासह बीड जिल्हावासियांच्या जिव्हाळ्याची नगर-बीड-परळी रेल्वे आजपासून आष्टीपर्यंत धावणार आहे. जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून याबाबत मनस्वी आनंद आहे. यासाठी योगदान देणारे गोपीनाथराव मुंडे, विलासराव देशमुख, बीड रेल्वे कृती समितीचे सर्व सदस्य यांचे आज स्मरण होत आहे’, असे ट्वीट धनंजय मुंडे यांनी केले आहे.