राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी राजकारणात यशस्वी प्रवेश केला आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं असून रोहित पाटील यांचा विजय झाला आहे. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने १० जागा जिंकल्या आहेत. तर दुसरीकडे शेतकरी विकास पॅनल ६ आणि एका जागेवर अपक्ष निवडून आले आहेत.

Nagar Panchayat Election Result 2022 LIVE: नगरपंचायत, झेडपीचा निकालाचे लाईव्ह अपडेट्स, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला सत्ता

Mohite-Patil, Madha, Mohite-Patil Madha,
माढ्यात मोहिते- पाटलांच्या प्रवेशाने राजकीय गणिते बदलली
jalgaon, raver lok sabha seat, eknath khadse, sharad pawar, ncp sharad pawar group upset, bjp, lok sabha 2024, sattakaran, election 2024,
खडसे यांच्या खेळीने शरद पवार गटात संतप्त भावना
Rahul gandhi S Jaishankar
“ते चीनचं नाव घ्यायलाही घाबरतात”, परराष्ट्रमंत्र्यांच्या ‘त्या’ प्रतिक्रियेवर काँग्रेसचा संताप
Shahu Maharaj
शाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह संदेश; सतेज पाटील यांची पोलिसांकडे तक्रार

रोहित पाटील यांनी निवडणुकीत केलेला प्रचार चर्चेचा विषय ठरला होता. या निवडणुकीनंतर माझा बाप तुम्हाला आठवल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांचं हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं होतं. त्यांच्या भावनिक सादेला जनतेने चांगला प्रतिसाद दिला असून विजय मिळवून दिला आहे. यानिमित्ताने रोहित पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाल्याची चर्चा आहे.

रोहित पाटील यांची प्रतिक्रिया –

रोहित पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली असून म्हटलं की, “मी सर्वांचा आभारी आहे. सर्वसामान्यांनी ही निवडणूक हाती घेतली होती. राष्ट्रवादी पक्षावर झालेला अन्याय असो किंवा येथील प्रश्न असतील ते घेऊनच आम्ही निवडणूक लढलो आणि लोकांनी आम्हाला विजय मिळवून दिला. हा विजय सर्वसामान्यांचा आहे”.

“आम्ही लोकांसमोर विकासकामं घेऊन उतरलो होतो. लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणी समजून घेत होतो. लोकांचा आमच्यावरचा विश्वास वाढला आणि त्यामुळेच हा विजय झाला,” असं रोहित पाटील म्हणाले आहेत.

निकालाच्या दिवशी माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आबांच्या आणि राष्ट्रवादी पक्षाच्या विचारांना मानणाऱ्या कार्यकर्त्याने आम्हाला सत्तेत बसवलं आहे. आम्हा सर्वांना आबांची आठवण येत आहे”.

रोहित पाटील यांनी चांगली कामगिरी केली यामुळे त्यांना लोकांनी सत्ता दिली असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

साताऱ्यातील कोरेगाव नगरपंचायतीत शिवसेनेची एकहाती सत्ता

साताऱ्यात शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेना जोरदार धक्का दिला आहे. शिवेसना १३ जागांवर विजयी झाली असून एकहाती सत्ता मिळवली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीला फक्त ४ जागा मिळाल्या आहेत.

राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना धक्का; कडेगाव नगरपंचायतील फुललं कमळ

दुसरीकडे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना मोठा धक्का बसला आहे. कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत भाजपाचा विजय झाला आहे. प्रतिष्ठेच्या लढतीत संग्रामसिंह देशमुख यांनी मिळवला विजय.