नागपुरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एका महिलेने आपल्या अल्पवयीन भाच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आळी आहे. मामीनेच आपल्या भाच्याचं लैंगिक शोषण केल्याच्या या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रथामिक दाव्यानुसार या महिलेने लैंगिक छळ करतानाचा व्हिडीओ शूट करुन नंतर तो व्हायरल करण्याची धमकी देत अनेकदा अशाप्रकारचा छळ केल्याची माहिती समोर आलीय.

नागपूर जिल्ह्यामधील पारशिवनी येथे हा सर्व प्रकार घडला आहे. या प्रकरणामधील आरोपी मामीचं वय हे केवळ २१ वर्ष इतकं आहे. तर पीडित भाचा हा १६ वर्षांचा आहे. या प्रकरणामध्ये आरोपी महिलेविरुद्ध पारशिवनी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या महिलेने भाच्याचा लैंगिक छळ करुन त्याचे व्हिडीओ शूटींग केलं. त्यानंतर ही व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत या महिलेने वारंवार भाच्याचं शोषण केल्याचा दावा केला जातोय.

Four Year Old Girl Tortured in Hadapsar Pune
धक्कादायक : खाऊच्या आमिषाने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार
Theft of gas from cooking cylinders Two arrested for doing illegal business
स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून गॅस चोरी; पत्र्याच्या खोलीत बेकायदा व्यवसाय करणारे दोघे अटकेत
ashok mahato bihar rjd
६२व्या वर्षी लग्न करणाऱ्या कुख्यात गुंडाच्या पत्नीला लोकसभेचं तिकीट?
siddhu moosewala house video goes viral after his brother birth
वयाच्या ५८ व्या वर्षी सिद्धू मूसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म; घरातील जल्लोषाचा VIDEO व्हायरल

समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी महिलेने घरामध्ये कोणीही नसताना या मुलावर लैंगिक अत्याचार केले. या महिलेने लैंगिक अत्याचार करतानाचे व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये शूट केले. त्यानंतर हे व्हिडीओ दाखवून ही महिला आपल्या भाच्याला धमकावत होती. याच धमक्यांच्या जोरावर तिने त्यानंतर अनेकदा या मुलीचं लैंगिक शोषण केलं. या प्रकरणामध्ये आता पोलीस अधिक तपास करत असून लैंगिक छळाबरोबरच लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणीचा गुन्हा या महिलेविरोधात दाखल करण्यात आलाय.

सध्या नागपूरमध्ये या प्रकरणाची चर्चा असून मामी-भाच्याच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या प्रकरणावरुन संताप व्यक्त केला जातोय.