स्थानिक संस्था कराविरोधात (एलबीटी) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिका मंगळवारी फेटाळण्यात आल्या. एलबीटीविरोधात पुणे, नागपूर, कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील व्यापाऱयांनी बंद पुकारला आहे. एक एप्रिलपासून या महापालिकांच्या क्षेत्रात एलबीटीच्या आकारणीला सुरुवात झालीये. व्यापाऱयांचा एलबीटी आकारणीला विरोध असल्यामुळे त्यांच्या विविध संघटनांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने फेटाळल्या. याचिका फेटाळल्यामुळे व्यापाऱयांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Apr 2013 रोजी प्रकाशित
एलबीटीविरोधातील याचिका नागपूर हायकोर्टाने फेटाळल्या
स्थानिक संस्था कराविरोधात (एलबीटी) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिका मंगळवारी फेटाळण्यात आल्या.
First published on: 02-04-2013 at 05:43 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur high court dismissed petitions challenging lbt