scorecardresearch

Premium

कुख्यात गुंड अरुण गवळी मुलाच्या लग्नाला हजर राहणार; चार दिवसांची रजा मंजूर

नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने अरुण गवळीला पॅरोल मंजूर केला

Arun Gawli
अरुण गवळी ( संग्रहित छायाचित्र )

कुख्यात गुंड अरुण गवळी खून प्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्यातच अरुण गवळीला रजा ( पॅरोल ) मंजूर करण्यात आली आहे. अरुण गवळीने मुलाच्या लग्नासाठी मागितलेल्या अभिवचन रजेला(पॅरोल) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजुरी दिली आहे. यापूर्वीही अनेकदा अरुण गवळी रजेवर बाहेर आला होता.

अरुण गवळीच्या मुलाचे १७ नोव्हेंबरला मुंबईत लग्न आहे. त्या पार्श्वभूमीवर रजेची मागणी अरुण गवळीकडून करण्यात आली होती. त्यानुसार अरुण गवळीला ४ दिवसांची रजा मंजूर करण्यात आली. या रजेत पोलीस सुरक्षेसह अरुण गवळीने मुंबईला जावे, अशी अट कारागृह प्रशासनाच्या वतीने टाकण्यात आली होती. त्यासाठीचा खर्चही अरुण गवळीला करावा लागणार होता.

Mumbai Monsoon Latest Update
Weather Update: हवामान विभागाकडून आज, उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अलर्ट
jayant patil make satire on cm eknath shinde
सांगलीतील साखर कारखानदारीची सूत्रे जयंत पाटील यांच्याकडे?
Eggs thrown Meeting Teachers Bank
सांगली : शिक्षक बॅंकेच्या सभेत अंडीफेक, गदारोळ
army flood relief unit in nagpur
नागपूर: लष्कर धावले मदतीला

हेही वाचा : ठाण्यात शिंदे-ठाकरे गटांत जोरदार राडा, खासदार राजन विचारे यांच्यासमोर कार्यकर्त्यांना मारहाण

याविरोधात गवळीने नागपूर खंडपीठात फौजदारी याचिका दाखल करीत विना सुरक्षा आठ दिवसांची रजा मिळावा म्हणून न्यायालयाला विनंती केली. सर्व बाजू लक्षात घेत न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर चार दिवसांची रजा मंजूर केली आहे. दरम्यान, यापूर्वी मुलाचं आणि मुलीचं लग्न, आजारपण अशी कारणे देत अरुण गवळी बाहेर आला होता.

हेही वाचा : जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा स्वीकारणार का? विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले “माझ्याकडे…”

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर खून प्रकरणी कुख्यात गुंड अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २ मार्च २००७ रोजी मुंबईमधील असल्फा भागात कमलाकर जामसंडेकर यांची घरात घुसून गोळीबार करत हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी २००८ मध्ये अरुण गवळीला अटक केली. यानंतर २०१२ मध्ये विशेष न्यायालयाने अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nagpur jail authority grants 4 day parol arun gawli ssa

First published on: 15-11-2022 at 10:52 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×