जालना  –  जिल्ह्यातील दिवंगत नेते बाबासाहेब आकात यांच्या स्मृतीनिमित्त त्यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते नागराज मंजुळे यांना जाहीर झाला आहे. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांच्या हस्ते मंजुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. येत्या ३ एप्रिल रोजी परतूर येथे पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कपिल आकात यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी दहा वाजता  आयोजित या पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी विभागीय शिक्षण सहसंचालक डॉ. पंकजा वाघमारे, कवी  डॉ. दासू वैद्य, प्राचार्य डॉ. भागवत कटारे, प्राचार्य डॉ. शिवाजी मदन उपस्थित राहणार आहेत. शिक्षण, कला, क्रीडा, सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असणाऱ्या महाराष्ट्रातील नामवंतांना बाबासाहेब आकात यांच्या स्मृतीनिमित्ताने दरवर्षी पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे यंदाचे चौथे वर्ष आहे.