Nalasopara Rape Case : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर आता आणखी एक धक्कादायक घटना नालासोपारा येथून समोर आली आहे. एका ३० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी तिने थेट पोलिसांत धाव घेतल्याने हा प्रकार उजेडात आला. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात महिला अत्याचाराच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहे. बदलापूर येथे चार वर्षांच्या दोन चिमुरड्यांवर शाळेतील शिपायाकडूनच लैंगिक अत्याचार झाले. या मुलींच्या पोटात दुखू लागल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. त्यामुळे बदलापूरकरांनी हे प्रकरण लावून धरल्याने आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली. हे प्रकरण अजूनही चर्चेत असताना आता दुसरी घटना समोर आली आहे. नालासोपारा येथे ३० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.

हेही वाचा >> टिटवाळ्याजवळ वीटभट्टी मजूर महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार   

याप्रकरणी पीडितेने पोलिसांत धाव घेतली. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार अकोले पोलीस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ६४, ७० (१) आणि ३५१ (२) अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र मोर्या (३१), प्रकाश सिंग (२६) आणि पंचराज सिंग (३५) अशी आरोपींची नावे आहेत. या तिघांनाही कोर्टात सादर करण्यात आलं होतं. कोर्टाने तिघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा >> नालासोपारा पुन्हा हादरले, अल्पवयीन मुलीवर दोघांचा सामूहिक बलात्कार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा गजाआड

काही दिवसांपूर्वी नालासोपाऱ्यात १७ वर्षी मुलीवर दोन जणांनी बलात्कार केला होता. पश्चिम उपनगरातील एका १७ वर्षीय मुलीची एक मैत्रीण नालासोपारा येथे राहते. या मैत्रिणीच्या निमित्ताने तिची एका स्टुडिओत काम करणाऱ्या सोनू नामक तरुणाशी ओळख झाली. या तरुणाला भेटायला गेलेल्या पीडितेवर तरुणासह त्याच्या मित्राने नगीनदासपाडा येथील निर्जनस्थळी बलात्कार केला. तिने याप्रकरणी तिच्या पालकांना घडला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली.