How did Nana Patekar Died and What Happened : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून गोव्याच्या मणिपाल रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं. पुण्यात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, त्यांना मध्यरात्रीच अस्वस्थ वाटत होतं, त्यांनी यासंदर्भात त्यांच्या मित्राला मेसेजही केला होता, अशी माहिती आता मणिपाल रुग्णालयाचे डॉ.शेखर साळकर यांनी दिली. त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.
डॉ. शेखर साळकर म्हणाले, पहाटे ४.१८ च्या दरम्यान नाना पाटेकरांचा केअर टेकर रुग्णवाहिका घेण्यासाठी आला होता. आमची रुग्णवाहिका ४.२० पर्यंत त्यांच्या निवासस्थानी पोहोचली. आमच्या रुग्णालयाशेजारीच ते राहत होते. ते कोणताही प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे आमच्या पथकाने त्यांना सीपीआर दिला. सीपीआर देता देता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पहाटे ४.३० वाजता ते रुग्णालयात पोहोचले. तासभर सीपीआर दिल्यानंतर ५ वाजून २० मिनिटांनी त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोणीही नव्हते. त्यांचे केअर टेकर आणि मित्रपरिवार होता”.
घरात नेमकं काय घडलं?
हृदयविकाराचा झटका येण्याआधी नेमकं काय घडलं? त्यावेळी घरात कोण कोण होतं? नानांना अस्वस्थ वाटत असल्याचं कोणाच्या लक्षात आलं, याबाबतही डॉ. साळकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले, “नाना पाटेकर यांनी मध्यरात्री २.३० वाजताच त्यांच्या मित्राला मेसेज करून अस्वस्थ वाटत असल्याचं कळवलं होतं. पण रात्र असल्याने मित्राने मेसेज पाहिला नाही. मात्र, ज्यावेळी त्यांच्या मित्राने मेसेज पाहिला, तेव्हा ते लागलीच पहाटे ४ वाजता त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं की नाना फरशीवर पडले होते, त्यांना प्रचंड घाम सुटला होता. त्यामुळे त्यांनी केअर टेकरला बोलावून रुग्णवाहिका मागवली. रुग्णालयात त्यांना आम्ही सीपीआर दिला, पण आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही.”
शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
दरम्यान, शवविच्छेदन करण्यासाठी गोवा मेडिकल कॉलेज येथे मृतदेह नेण्यात आला आहे. तर, अभिनेते नाना पाटेकर यांचे मराठी नाटकासह मराठी, हिंदी सिनेमातील अतुलनीय योगदान पहाता त्यांचे अंत्यसंस्कार “शासकीय इतमामात” करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केले आहे.
नाना पाटेकर यांनी रंगभूमीवरून (थिएटर) सुरुवात केल्यानंतर ‘गमन’ (१९७८) या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘परिंदा’ (१९८९), साठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आणि ‘क्रांतीवीर’ (१९९४), चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे त्यांनी ‘अग्नी साक्षी’, ‘खामोशी: द म्युझिकल’, ‘अब तक छप्पन’, ‘अपहरण’, ‘राजनीती’, ‘वेलकम’ आणि मराठी चित्रपट ‘नटसम्राट’ यांसह अनेक चित्रपटांमध्ये कौतुकास्पद भूमिका केल्या. ते एक दिग्दर्शक, लेखक आणि २०१३ चे ‘पद्मश्री’ पुरस्कार विजेते देखील होते.
